आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्डिओ एक्सरसाइजला चांगला पर्याय स्पॉट रनिंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर तुम्हाला कमी वेळात संपूर्ण शरीराला सुडौल करायचे असेल तर तुमच्यासाठी स्पॉट रनिंग योग्य आहे. 


असे करा 
एका जागी उभे राहून जॉगिंग करा. यादरम्यान पंजांवर जोर देऊन उडी मारा आणि टाचा जमिनीवर टेकवून ठेवा. या व्यायामापूर्वी स्ट्रेचिंग केल्यास त्याचा लवकर फायदा होतो. 


मधुमेहावर नियंत्रण
यामुळे इन्सुलिन तयार होण्याची प्रक्रिया सुधारते आणि शरीरात रक्ताच्या साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. यामुळे दुखापत होण्याची शक्यताही कमी करण्यास मदत करते. 


मेटाबॉलिझम वाढतो 
स्पॉट रनिंग हाय इंटेन्सिटी वर्कआउटच्या श्रेणीतील आहे. यामुळे शरीरातील मेटाबॉलिझम वाढतो आणि कॅलरी वेगाने जळतात. 


अस्थमात उपयोगी 
या व्यायामामुळे फुप्फुसे मजबूत होतात. दररोज केल्यास श्वसनाची क्रिया सुधारते. अस्थमाच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नक्की करावा. हा यकृतासाठीही फायदेशीर आहे. 

रक्तदाबावर नियंत्रण 
धावतांना धमण्या मोकळ्या अाणि संकुचित होतात. यामुळे धमण्यांचाही व्यायाम हाेतो आिण रक्तदाब नियंत्रणात राहतो. यामुळे कमी रक्तदाब आिण उच्च रक्तदाबात फायदेशीर आहे. 


प्रतिकारशक्तीत वाढ 
हा व्यायाम नियमितपणे केल्यास प्रतिकारशक्ती वाढते. यामुळे आजारापासून बचाव होण्यास मदत होते. 


-दररोज १ तास स्पॉट रनिंग केल्यामुळे 700 कॅलरी जळतात


हे करू नका 
- या व्यायामादरम्यान जमिनीवर जोरात पाय आपटू नका. यामुळे पायांमध्ये वेदना होऊ शकतात. 
- या व्यायामाला वेगाने करू नका. यामुळे शरीरावर अनावश्यक दबाव पडतो आिण तुम्हाला लवकर थकवा येतो. 

बातम्या आणखी आहेत...