आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपाशीवर ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणी; आकोल्यात प्रात्यक्षिक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- कीटकनाशक फवारणीचा मानवी शरीरावर परिणाम होत असल्याचे दिसून आल्याने त्याला पर्याय म्हणून कपाशीवर ड्रोनद्वारे फवारणी करण्यात येणार आहे. त्याचे प्रात्यक्षिक नुकतेच घेण्यात आले. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले या वेळी उपस्थित होते. 


डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, टाटा कन्सलटंसी सर्व्हिसेस आणि पडगिलवार इंडस्ट्रीज अकोला यांच्यात या बाबत करार झाला आहे. त्या अंतर्गत ड्रोनद्वारे फवारणी करणे, पीक सर्व्हे या संदर्भात सामंजस्य करार झाला आहे. प्रात्यक्षिक देण्यासाठी टाटा कन्सलटंसीचे राजेश उरकडे, विनोद हैद्राबाद, श्रीकांत पडगिलवार यांचे सहकार्य लाभले. 


ड्रोनद्वारे कपाशी पिकावर फवारणी करण्याचे प्रात्यक्षिक घेऊन त्याची व्याप्ती राज्यभर वाढवण्याचा मानस आहे. पुढच्या टप्प्यात कपाशीसोबत तूर, सोयाबीन या पिकांवर देखील १ ते १० फुटावरुन फवारणी शक्य असल्याचे सांगण्यात आले. स्वयंचलित पद्धतीने फवारणी करण्यात येत असल्याने ही पद्धत सुरक्षित आहे.स्वयंचलित यंत्राद्वारे एका एकरावर पंधरा मिनिटात फवारणी केली जाऊ शकते. त्यामुळे वेळेच्या दृष्टीने देखील उपयुक्त असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. 


या तंत्राद्वारे कीटकनाशके पानांना जाऊन चिकटतात त्यामुळे किडीचे नियंत्रण शक्य आहे, याकडेही लक्ष वेधण्यात आले. प्रात्यक्षिक प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. दिलीप मानकर, डॉ. सेठी, डॉ. शैलेश ठाकरे, डॉ. धीरज कराळे आदी उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...