आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सबरीमालात महिलेवर टाकला मिरची स्प्रे !

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोची : २०१९ मध्ये सबरीमालामधील अय्यप्पा मंदिरात प्रवेश करणाऱ्या पहिल्या महिला बिंदू अम्मिनी यांच्यावर मंगळवारी एका कार्यकर्त्याने मिरची स्प्रेने हल्ला केला. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्यासह चार महिला कोची विमानतळावर दाखल झाल्या होत्या. त्यांच्यासोबत केरळमधील कन्नूर विद्यापीठ्यातील प्राध्यापिका बिंदू अम्मिनी या अय्यप्पा मंदिराचे दर्शन घेण्यासाठी रवाना झाल्या. यानंतर या महिला सुरक्षेची मागणी करण्यासाठी पोलिस आयुक्तांच्या कार्यालयात पोहोचल्या. तृप्ती देसाई पोहोचल्या असल्याची माहिती मिळताच, भाविकांचा मोठा जमाव आयुक्तांच्या कार्यालयाजवळ एकत्रित झाला. या जमावाने अयप्पा शरणम या मंत्राचे उच्चारणही केले. पोलिस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर, कागदपत्रे घेण्यासाठी गाडीजवळ गेलेल्या बिंदू यांच्यावर श्रीनाथ या भक्ताने मिरची स्प्रेने हल्ला केला. या घटनेनंतर बिंदूंना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तृप्ती देसाईंची सुरक्षा देण्याची मागणी पोलिसांनी फेटाळल्यानंतर त्यांनी अय्यप्पा मंदिराचे दर्शन घेऊनच केरळ सोडणार असल्याचे सांगितले. तृप्ती देसाई यांनी मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता.

हा देसाईंचा कट, केरळच्या मंत्र्यांचा आरोप


मंदिरात प्रवेश करण्याच्या निर्णयामागे कट असल्याचा आरोप केरळमधील मंत्री कडाकमपल्ली यांनी मंगळवारी केला. ते म्हणाले की, तृप्ती देसाई या पुण्याच्या असून, तिथे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वर्चस्व आहे. सबरीमालामध्ये शांततेत सुरू असलेल्या यात्रेमध्ये अडथळा निर्माण करण्यासाठीच हे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांनी केला.
 

बातम्या आणखी आहेत...