आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री स्पृहा जोशीचे पती वरद लघाटेचा सिनेसृष्टीत डेब्यू, असा घडला योगायोग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: अभिनेत्री स्पृहा जोशीचा लवकरचा 'होम स्वीट होम' हा सिनेमा रिलीज होत आहे. ह्या सिनेमात तिचे पती वरद लघाटे ह्यांनी 'इकडून तिकडे' ह्या गाण्यातून सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. नुकतेच हे गाणे युट्यूबवर रिलीज झाले आहे. 

 

ह्या गाण्याविषयी स्पृहा सांगते, "माझ्यावर चित्रीत झालेले हे गाणे, अजय गोगवले ह्यांनी गायले आहे.  अजय-अतुल ह्यांच्या संगीताची मी चाहती आहे. तसेच अजय गोगावलेंचा स्वरसाज असलेले  एखादे गाणे आपल्या सिनेमात असावे, अशी माझी  ब-याच कालावधीपासून इच्छा होती. ही इच्छा 'इकडून तिकडे' गाण्यामूळे पूर्ण झाली. हे गाणे माझ्या हृदयाजवळचे असण्याचे दूसरे कारण, ह्यात वरदचा असलेला गेस्ट अपिअरन्स. जो योगायोगाने घडला आहे."

स्पृहा आपल्या पतीच्या डेब्यूविषयी सांगते, "वरद नेहमी मला आणि माझ्या फिल्ममेकर्सना मस्करीत सांगतो, की, मला एक गेस्ट अपिअरन्स करायचा आहे. 'इकडून तिकडे'च्या चित्रीकरणावेळी वरद मला भेटायला सेटवर आला होता. हृषिकेशने वरदला एक छोटासा अपिअरन्स करशील का, अशी विनंती केली. आणि वरदचा डेब्यू झाला."

 

स्पृहा हसून म्हणते, "टू स्टेट्स सिनेमाच्या एका सिक्वेन्सचे शुटिंग वरदच्या ऑफिसमध्ये झाले होते. त्यावेळी तो एका सिक्वेन्समध्ये पाठमोरा उभा होता. म्हणूनच वरद नेहमी मस्करीत म्हणतो, की, मी जी फिल्म करतो ती, 200 करोडचे बॉक्स ऑफिस कलेक्शन करते. त्यामूळे आता तूही ह्या फिल्मने 200 करोड क्लबचा हिस्सा होणार."

बातम्या आणखी आहेत...