Home | TV Guide | Sreesanth Kids Cries After Fearing From Fans And Photographers

पत्नी, साडे तीन वर्षांची मुलगी आणि दोन वर्षांच्या मुलासोबत आउटिंगसाठी निघाला होता श्रीसंत, पाहताच क्रेझी झाले फॅन्स, देऊ लागले त्याच्या नावाच्या घोषणा, मुलगी घाबरली आणि जोरजोरात रडू लागली : VIDEO

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Jan 14, 2019, 12:08 AM IST

फोटोग्राफर्सना पाहून घाबरला श्रीसंतचा मुलगा, रडत रडत आई भुवनेश्वरीकडे पळाला... 

  • मुंबई : 'बिग बॉस 12' चा सर्वात पॉप्युलर कंटेस्टन्ट असलेला श्रीसंथ शुक्रवारी पत्नी भुवनेश्वरी, सडे तीन वर्षांची मुलगी संविका आणि 2 दोन वर्षांचा मुलगा सूर्यश्रीसोबत आउटिंगसाठी निघाला होता. श्रीसंतच्या फॅन्सची नजर त्याच्यावर पडली, त्यांनी त्याला घेरले. सर्व फॅन्स जोरजोरात 'श्रीसंत-श्रीसंत' अशा घोषणा देऊ लागले, ज्यामुळे श्रीसंत तर खुश झाला मात्र त्याची मुलगी घाबरली आणि तिने जोरजोरात रडायला सुरुवात केली. तेव्हा भुवनेश्वरीने तिला गप्प करण्याचा प्रयत्न केला.

    फोटोग्राफर्सला पाहून घाबरला मुलगा आणि रडत आईकडे पळाला...
    फोटोग्राफर्स जेव्हा श्रीसंत आणि त्याच्या फॅमिलीचे फोटोज घेण्यासाठी पुढे आले तेव्हा. श्रीसंतचा मुलगा सूर्यश्री घाबरला आणि आई भुवनेश्वरीकडे पळाला. भुवनेश्वरीने सूर्यश्रीला उचलून घेतले आणि गप्प केले. यादरम्यान श्रीसंतने मुलगी संविकाला उचलीं घेतले होते. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर 'बिग बॉस 12' नंतर श्रीसंत स्टंट बेस्ड रियलिटी शो 'खतरों के खिलाड़ी 9' मध्ये दिसत आहे. याव्यतिरिक्त त्याची फिल्म 'कॅबरे' ही 11 जानेवारीला डिजिटल प्लेटफॉर्म Zee5 वर रिलीज झाली आहे.

Trending