आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साऱ्या जगाने पाहिले! तरीही बिग बॉसच्या घरात श्रीसंत म्हणतो, भज्जीने त्या दिवशी चापट मारलीच नव्हती!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रियालिटी शो बिग बॉसच्या सीजन 12 मध्ये सदस्य होऊन पोहोचलेला माजी क्रिकेटर श्रीसंतने 2008 मध्ये घडलेला आयपीएलच्या त्या घडामोडीवर एक खुलासा केला. त्यावेळी झालेल्या आयपीएलमध्ये हरभजन सिंग उर्फ भज्जीने सर्वांसमोर भर मैदानात श्रीसंतच्या कानाखाली लावली होती. यावर श्रीसंत रडला देखील होता. क्रिकेट जगतातील सर्वात फेमस क्षणांपैकी एक असलेली ती घटना प्रत्यक्षात घडलीच नव्हती. आणि आपल्याला भज्जीने चापट मारलाच नव्हता असा दावा श्रीसंतने केला आहे. 


आणखी काय म्हणाला श्रीसंत?
- बिग बॉस कंटेस्टंट सुरभीने श्रीसंथला भज्जीच्या चापट कांडवर प्रश्न केला. त्यावर बोलताना श्रीसंत म्हणाला, ''भगवान आणि आई-वडिलांच्या आशीर्वादाने मला 'बिग बॉस'च्या घरात येण्याची संधी मिळाली. त्यामुळे, मला त्या घटनेबद्दल सांगावेच लागेल. मला आठवते, की 2008 मध्ये मुंबई इंडियंस आणि किंग्स इलेवन पंजाबची मॅच चंदीगड येथे झाली होती. त्यात माझी चूक एवढीच होती की मी मॅच जरा जास्तच सीरियस घेतली होती."
- तो पुढे म्हणाला, "त्या दिवशी नेमके काय घडले, हे मी सांगतो. कदाचित अनेकांनी व्हिडिओमध्ये नेमके काय घडले हे पाहिलेच नसावे. मैदानावर भज्जीसोबत हॅन्डशेक करण्यासाठी मी गेलो होतो आणि त्याला हार्ड लक भज्जी असे म्हणालो होतो. यावर भडकलेल्या हरभजनने मला मारण्यासाठी हात उचलला परंतु, चापट मारला नाही. त्याला चापट म्हणताच येणार नाही."


यामुळेच रडलो...
केवळ चापट मारल्यानंतर विषय संपला नाही. त्या दिवशी सर्वांसमोर श्रीसंत मार खाल्ल्यानंतर रडलाही होता. मग, अशात सर्वांना दुसरा प्रश्न पडला की श्रीसंतला भज्जीने त्या दिवशी कानाखाली लावली नव्हती. तर श्रीसंत का बरं ढसा-ढसा रडत होता? श्रीसंतने याचे देखील अतिशय चलाखीने उत्तर दिले. तो म्हणाला, हरभजन त्या दिवशी खूप रागात होता. त्याने मला मारण्यासाठी हात उचलला त्यावेळी मी देखील तसेच काही करून त्याला दाबले असते. पण, एखादी व्यक्ती खूपच रागात असे वागत असल्यास त्याला काहीच करता येत नाही. त्यावेळी मी हेल्पलेस होतो म्हणूनच रडलो.'' पण, बिग बॉसच्या घरातील किती लोकांना श्रीसंतचे म्हणणे खरे वाटले हा देखील एक प्रश्नच आहे.

बातम्या आणखी आहेत...