आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'कुणी मान पकडली तर कुणी केस ओढले, पण हे सर्व प्रेक्षकांपासून लपवले गेले, चॅनेल फक्त तेच दाखवते जे त्यांना दाखवायचे असते, माझाही एक सीन नाही दाखवला' श्रीसंतने सांगितले Bigg Boss 12 अनेक Secrets

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : माजी क्रिकेटर आणि अभिनेता श्रीसंत जेव्हापासून  'बिग बॉस 12'च्या घरातून परतला आहे तेव्हापासून तो सतत चर्चेत आहे. आता एका इंटरव्यूमध्ये त्याने शोशी निगडित काही अनुभव शेयर केले आहेत. त्याने अनेक अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्या शोमध्ये तर दाखवल्या गेल्याच नाहीत पण चॅनेलचे अप Voot देखील दाखवल्या नाहीत. श्रीसंतीनुसार शोदरम्यान तो एकदा अशा निर्णयावर आला होता की, त्याला शो सोडून परत पत्नी आणि मुलांकडे यावेसे वाटले. मात्र, याचे कारण त्याने सविस्तर सांगितले नाही.  

 

श्रीसंत म्हणाला - मलाही शो जिंकायचा होता...
- श्रीसंत इंटरव्यूमध्ये म्हणाला - "हे खोटे सांगणार नाही की, मी शो जिंकू इच्छित नव्हतो. मलाही जिंकायचे होते. जर असे झाले असते तर खूप चांगले झाले असते. पण विश्वास ठेवा, जेव्हा दीपिका कक्कर आणि मी फायनल स्टेजवर पोहोचलो तेव्हा दोघांनीही एकमेकांना म्हंटले की, 'आता कुनूही जिंकले तरी एकही फरक पडत नाही. कारण आपण दोघांनीही चांगले खेळले आहे'. ईमानदारीने सांगतो, मी खूप खुश आहे की, दीपिकाने शो जिंकला. ती डिजर्व करत होती. मी तिला आधी पहिले होते, पण कधी जास्त इंटरेक्शन नाही झाले. आम्ही एकमेकांना अनेकदा सपोर्ट केला. जेव्हा केव्हा ती अपसेट व्हायची तेव्हा मी तिला सपोर्ट करायचो आणि तीही माझ्यासाठी हे करायची. जेव्हा मला राग यायचा किना मी अपशब्द बोलायचो तेव्हा ती मला शांत करायची". 

 

सुरभि राणाची साथ का दिली नाही ?
या प्रश्नाला उत्तर देताना श्रीसंत म्हणाला, "मी तिच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो. देव तिच्यावर अशीच कृपादृष्टी ठेवो. जे शोमध्ये झाले, ती शोमधील गोष्ट होती. मला वाटते की, वाइल्ड कार्ड पर्सन असल्यामुळे तिच्याकडे प्लान होता. आता तिला तिच्या करियरवर फोकस करण्याची गरज आहे. तिने तिच्यापेक्षा मोठ्या लोकांवर ओरडले नाही पाहिजे. याने तिला आनंद मिळतो का आणि जर मिळत सेल तर तिने ते करत राहावे" श्रीसंत पुढे म्हणाला, "एक महिला असून ती घरात जशी वागली त्याची तुलना इतर महिलांशी होऊ शकत नाही. ती मला जे म्हणाली ती तिचा प्लॅन होता. ती फेक होती"

 

श्रीसंतने सांगितले ते सीन, जे शोमध्ये नाही दखवले गेले... 
श्रीसंतने सांगितले, "माझे म्हणणे आहे की ट्रॉफी जिंकण्यासाठी काही पैरामीटर्स असतात, जे क्रॉस केले नाही पाहिजे. पण काही लोकांनी असे केले आणि त्यांच्यावर काही अक्षांहि घेतली गेली नाही. सुरभिने दीपिका कक्करची मान जोरात पकडली होती की, ती खाली पडली. ते voot  वरही दाखवले गेले नाही. त्यानंतर तिने सृष्टी रोडेचे केस धरून ओढले आणि ती एका स्लैबवर जवळ-जवळ पडलीच होती. देव न करो, जर ती खरंच स्लैबवर पडली असती तर. हेसुद्धा वूटवर दाखवले गेले नाही. जसलीन मथारू आणि सृष्टी रोडे पळत होत्या. जेव्हा सृष्टीने जसलीनला थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिने पूलच्या स्लैबला धक्का दिला. हेही दाखवले गेले नाही. ते जे काही दाखवू इच्छित होते, मला व्हिलनच्या रूपात दाखवले गेले. मी करणवीर बोहराजवळ गेलों आणि रडलो. 9 व्या आठवड्यात मी त्याला म्हणालो की, मी जे काही बोललो त्याचा उद्देश तुला दुखावण्याचा नव्हता. पण हे दाखवले गेले का ?". 'बिग बॉस' च्या घरात श्रीसंत आणि करणवीर यांच्यामध्ये खूप वादावादी झाली होती आणि दोघेही एकमेकांना खूप घालून पडून बोलले होते. मात्र, शोमधून बाहेर पडल्यावर करणवीर बोहरा याला श्रीसंथचा नई त्याचा भूतकाळ असे म्हणला आहे. 

 

रोहित सुचांतीवर हात उचलण्याचे कारण ?
श्रीसंत म्हणाला, "जर कुणी तुमच्या मुलांविषयी वाईटसाईट बोलत असेल तुम्ही कसे रिअक्ट व्हाल. रोहित नशीबवान आहे की, मी तशी रिअक्शन दिली नाही, जशी द्यायला हवी होती. रोहित आपल्या मैनेजरच्या अंडर काम करत आहे. विकास गुप्ताने त्याला माझ्याविरुद्ध भडकवले असेल". जेव्हा श्रीसंतला विचारले गेले की, रोहितला गे म्हणत होता तर तो म्हणाला, "मीच काय, सर्वच जण त्याला गे म्हणतात. पण मी त्याच्या पसंतीचा आदर करतो. मी त्याची थट्टा केली नाही. हे सर्व चेष्टेत होते आणि त्यावेळी रूममध्ये जसलीन आणि दीपिकासुद्धा होती".