आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई : 'बिग बॉस 12' चे सर्वात पॉप्युलर कन्टेस्टंट श्रीसंत घरात गेल्यानंतर सर्वात जास्त चर्चेत होते. नखरे दाखवण्यापासून ते अक्रामक होण्यापर्यंत, माजी क्रिकेटरने आपल्या सर्व रियल साइड दाखवल्या. जिथे काही कण्टेस्टन्ट मात्र मुखवटा घातल्यासारखे गेम खेळात होते. दीपिका कक्कर शोची विनर बनली आणि श्रीसंत रनरअप झाला. इविक्शनच्या नंतर श्रीसंतने DainikBhaskar.com सोबत बोलताना सांगितले, 'बिग बॉस' चा प्रवास, ट्रॉफी न मिळाल्याचे दुःख, मॅच फिक्सिंग, क्रिकेटला मिस करणे. आदींबद्दल सांगितले.
श्रीसंतशी केलेल्या बातचितीतील काही महत्वाचा भाग...
पूर्ण शो माझ्या चारही बाजूंना फिरतो..
तुम्हाला माहित आहे, मी पहिल्यापासूनच हे जाणत होतो की मी टॉप थ्रीमध्ये असेल. पूर्ण शो माझ्याच भोवती फिरत होता. माझ्यावर खूप आरोप झाले. मी लाइमलाइट मिळवण्यात यशस्वी झालो आणि हीच या शोची गरज होती. पूर्ण प्रवास शानदार होता. सुरुवातीला आक्रमक होता, पण हळू हळू मला रिअलाईझ झाले की तिथल्या तिथे रिऍक्ट व्हायला पाहिजे. मी इतर लोकांसारखा मुखवटा घालून बसलो नव्हतो. दुर्दैवाने मी ट्रॉफी नाही जिंकू शकलो. पण एक गोष्ट ठामपणे सांगू शकतो की कोट्यवधी लोकांची मने जिंकली.
दीपिकाने टायटल जिंकल्याने मी खुश आहे...
खुश आहे की दीपिका कक्करने टायटल जिंकले. कुठे ना कुठे मला माहित होते की ती जिंकेल. एवढेच नाही तर मी घरात देखिल म्हणालो होतो कि ती चॅनेलचा चेहरा आहे. ती निश्चितच जिंकेल. कोणाला वाटले होते की माझे म्हणणे खरे ठरेल. मला आनंद आहे की माझ्या बहिणीने शो जिंकला. 'बिग बॉस' च्या घरात जे काही केले, त्याचा मला पश्चात्ताप नाही.
मॅच फिक्सिंगशी जोडले गेलेलं काही क्रिकेटर अजूनही खेळत आहेत...
- माझ्या आयुष्यात दोन मोठे इंसीडेंट्स घडले आहेत. एक म्हणजे मॅच फिक्सिंग आणि दुसरे म्हणजे हरभजन सिंहची चपराक. हा माझ्यासाठी केवळ शो नव्हता, एक ग्रैंड प्लेटफॉर्म होता. शोमध्ये अनेक लोक मुखवटा घालूनच आले होते, पण मी श्रीसंतबनूनच आलो होतो. कित्तेक असे क्षण होते, जेव्हा खूप प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पण सामान्य आयुष्यात असे झाले नाही. एका प्रकारे इतरांना माफ करण्यासाठी मी स्वतःला माफ केले आहे. मी या बाबतीत बोललो कारण त्यावेळी मला ते बोलणे योग्य वाटले. काहीही ठरवलेले नव्हते.
- मी बीसीसीआईच्या असामान्य बनविषयीही बोललो आहे. ज्यामुळे मला स्वतःच्या मुलांच्या शाळा आणि कॉलेजच्या प्लेग्राऊंवर जाण्याची परवानगी नाही. मला एखाद्या एसोसिएशनची परवानगी घावी लागते. जी लायकही नसते. माझा विश्वास करा, इथे काही अपराधी क्रिकेटर आहेत की जे मॅच फिक्सिंगमध्ये सामील होते, पण अजूनही खेळत आहेत. मला क्लीन चिट मिळाली आहे, तरीही मी वाट पाफातो आहे. त्यामुळे जास्त दुःख होते. आयुष्यातील 6 वर्ष वाया घालवले आहेत. जे मी कधीही विसरू शकत नाही.
क्रिकेटला मिस करतो...
क्रिकेटला मिस करतो आहे. असे वाटते की पहिले मी एक क्रिकेटर होतो आणि आता अभिनेता बनलो आहे. आता देशासाठी खेळण्याची अशा आहे. जर बीसीसीआईने परवानगी दिली तर. जर असे झाले नाही तयार मी आयुष्यात पुढे सरकेन. माझ्यासोबत माझी फॅमिली आहे ज्यांना माझी काळजी आहे. लाइफ इज गुड. माझ्या मनात कुणाविषयी द्वेष नाही. मी या खेळात सरवाइव करण्यासाठी आलो होतो, पण मी इथे शासन केले.
त्या मुलीसाठी परत आलो, जिच्यावर सर्वात जास्त प्रेम करतो...
शोमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट घडली ती माझ्या बायकोसाठी, जिच्यावर मी खूप जास्त प्रेम करतो. माझी वाइफ भुवनेश्वरीने एका फन लविंग आणि एग्रेसिव मुलावर प्रेम केले होते, जो 2013 नंतर हरवला होता. पण आता मी परत आलोय आणि त्यामुळे ती खूप खुश आहे. 'बिग बॉस 12' माझ्या आयुष्यातील सर्वात छान एक्सपीरियंस होता आणि मला या गोष्टीचा गर्व आहे की या शोमुळे मला स्ट्रेंथ आणि अनुभव मिळाला.
दोन चित्रपट आणि एक शो करत आहे...
कामाबद्दल बोलायचे तर माझ्याकडे चित्रपट 'कैबरे' आहे जो लवकरच रिलीज होणार आहे. याबरोबरच 'केम्पेगोडा 2'सुद्धा आहे. याव्यतिरिक्त 'खतरों के खिलाड़ी 9' आहे जे पुढच्या आठवड्यात लॉन्च होणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.