Home | Sports | From The Field | SRH beat CSK in IPL 2019

सनरायझर्स हैदराबादचा चेेन्नई सुपरकिंगच्या विजयरथाला लावला लगाम; धोनीची पाठदुखी चेन्नईला पडली महागात

वृत्तसंस्था | Update - Apr 18, 2019, 09:10 AM IST

हैदराबादने चार गड्यांनी मिळवला विजय; नाबाद अर्धशतक झळकावणारा बेयरस्ट्रो ठरला सामनावीर

  • SRH beat CSK in IPL 2019

    हैदराबाद - डेव्हिड वॉर्नर (५०) आणि जॉनी बेयरस्ट्रो (६१*) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर सनरायझर्स हैदराबाद संघाने चेन्नई सुपरकिंग संघावर बुधवारी आयपीएलच्या १२ व्या सत्रात ६ गडी राखून विजय मिळवला. सामना गाजवणारा जॉनी बेयरस्ट्रो सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.


    प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपरकिंग्जने २० षटकांत ५ बाद १३२ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादने १६.५ षटकांत ४ गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. यात सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने फटकेबाजी करत २५ चेंडंूत १० चौकारांसह ५० धावा ठाेकल्या. वॉर्नर व बेयरस्ट्रो जोडीने ३४ चेंडूंत ६६ धावांची भागीदारी रचली. बेयरस्ट्रोने ४४ चेंडूत ३ षटकार व ३ चौकारांसह नाबाद ६१ धावांची विजयी खेळी केली. विजय शंकर अवघ्या ७ धावांवर बाद झाला. दीपक हुडाने १३ धावांचे योगदान दिले. चेन्नईकडून फिरकीपटू इम्रान ताहीरने २० धावांत २ बळी घेतले. दीपक चहर व करण शर्माने प्रत्येकी एकाला टिपले.

    हैदराबादने चेन्नईला १३२ वर रोखले
    तत्पूर्वी, चेन्नईकडून डुप्लेसिसने ४५ व शेन वॉटसनने ३१ धावा जोडल्या. वॉटसन व डुप्लेसिस जोडीने ७९ धावांची भागीदारी केली. अखेरच्या १० षटकांत त्याचे फलंदाज ५३ धावा करू शकले. कर्णधार सुरेश रैनाने १३, रवींद्र जडेजा नाबाद १० व अंबाती रायडूने नाबाद २५ धावा केल्या. राशिद खानने २, खलील अहमद, शाहबाज नदीम व विजय शंकर यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.

Trending