• Home
  • National
  • Sri ganganagar Rajasthan News honour killing case in sriganganagar

मध्यरात्री प्रेयसीला भेटायला / मध्यरात्री प्रेयसीला भेटायला गेला तरुण, घरच्यांनी पाहिल्यावर दिला भयंकर मृत्यू;

Feb 06,2019 04:32:00 PM IST

श्रीगंगानगर (राजस्थान) - बीडी गावात सोमवारी मध्यरात्री एका तरुणाची लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. हत्येचे मुख्य कारण प्रेमसंबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. मृत हरजितसिंह रामगढिया मंडीचा रहिवासी होता. पोलिसांनी हत्येप्रकरणी संशयित मुख्य आरोपी तरुणीचे आजोबा, वडील तसेच काकाला अटक केली आहे. पोस्टमॉर्टमनंतर मंगळवारी सकाळी मृतदेह कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला. याबाबत मृताच्या भावानेच हत्येच्या आरोपावरून तक्रार दाखल केली आहे. मृत अविवाहित होता आणि गवंडीकाम करायचा.

हरजितचे 3 वर्षांपासून तरुणीसोबत प्रेमसंबंध होते
प्राप्त माहितीनुसार, हरजितसिंहचे काकांचे घर बीडी गावाजवळच आहे. यामुळे नानकसिंह यांच्या मुलीची हरजितशी ओळख्चा झाली. हळूहळू दोघांत प्रेमसंबंध फुलले. हरजितचे सुरमुखसिंह बावरी यांचा मुलगा नानकसिंह यांच्या घरी तीन वर्षांपासून येणे-जाणे होते. प्रेमसंबंधांवरून गावात पंचायत बोलावण्यात आली. हरजितसिंह यांना घरात येण्यास मनाई करण्यात आली. चर्चा अशीही आहे की, पंचायतीत हरजितसिंहने आपली चूक स्वीकारली. पंचायतीला विश्वास दिला की, तो कधीही नानकसिंहच्या घरी जाणार नाही.

तरुणाला 300 मीटर फरपटत नेत झाडाला बांधून मारले
मृत तरुणाचा भाऊ गुरप्रीतसिंहने पोलिसांत एफआयआर दाखल केली. एफआयआरनुसार, हरजीतसिंह सोमवारी रात्री 9 वाजता आपला काका सुखदेवसिंहची ढाणी 14 डीओएलमध्ये गेला होता. रात्री 12 वाजता हरजीतसिंह आपल्या घरी येत होता. वाटेत सुरमुख बावरी, नानक बावरी व श्रवण बावरी घात लावून बसलेले होते. तिन्ही आरोपींनी मिळून वाटेतून जात असलेला त्याचा भाऊ हरजितसिंहला पकडले आणि 300 मीटरपर्यंत फरपटत नेत आपल्या घरी नेले. आरडाओरड ऐकून सुखदेवसिंह व चुलत भाऊ राजपालसिंह हरजीतला सोडवण्यासाठी गेले तेव्हा त्यांनाही जिवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी हरजीतला बेदम मारहाण केली, यातच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

X