आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंका-बांगलादेश पहिला वनडे आज, मलिंगाचा अखेरचा वनडे; सामन्यानंतर घेणार निवृत्ती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलंबो - श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला वनडे शुक्रवारी खेळवला जाईल. हा सामना विशेष आहे. कारण श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाचा हा करिअरमधील अखेरचा वनडे सामना आहे. त्यानंतर तो निवृत्ती घेईल. कसोटीतून त्याने २०११ मध्ये निवृत्ती घेतली होती. मात्र, तो टी-२० खेळणे कायम ठेवणार असून पुढील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या विश्वचषकात तो सहभागी होईल. सामन्यापूर्वी मलिंगाने म्हटले की, ‘मी माझ्या निवृत्तीवर आनंदी आहे. त्यामुळे नव्या खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आणि आगामी विश्वचषकाची तयारी करता येईल. गेल्या काही दिवसांपासून आमचे प्रदर्शन चांगले होत नाही, मात्र आम्ही आणखी एक विश्वचषक जिंकू शकतो.’ श्रीलंकेने १९९६ मध्ये वनडे विश्वचषक आणि २०१४ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकला आहे. युवा खेळाडूंना संधी मिळाल्यावर स्वत:ला सिद्ध करावे लागेल, असे त्याने म्हटले. मलिंगाने वनडेमध्ये २१९ डावांत ३३५ बळी घेतले. तो श्रीलंकेकडून सर्वाधिक बळी घेण्यात तिसऱ्या स्थानी राहिला. २०१९ विश्वचषकात आपल्या संघाकडून सर्वाधिक १३ बळी घेतले. श्रीलंका मंडळाने म्हटले की, मलिंगा टी-२० निवडीसाठी उपलब्ध राहील.