आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावर फेक न्यूज पसरविणाऱ्यांना होणार 5 वर्षांचा तुरुंगवास, 10 लाखांचा दंड देखील भरावा लागणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलंबो - श्रीलंका सरकार फेक न्यूज आणि भडकावू भाषणे रोखण्यासाठी नवीन कायदा अंमलात आणण्याच्या तयारीत आहेत. या नवीन कायद्यांतर्गत सोशल मीडियावर चुकीची माहिती आणि द्वेष पसरवणाऱ्या आरोपींना 5 वर्ष तुरूंगवासाची शिक्षा आणि 10 लाख श्रीलंकन रूपये (3.92 लाख भारतीय रुपये)चा दंड ठोठावण्यात येणार आहे. 


ईस्टर हल्ल्यानंतर सरकार उचलले पाऊल
सरकारने अद्याप या गुन्ह्यांविषयीची व्याख्या सांगितली नाही. पण लवकरच दंड संहितेचे संशोधन करण्यात येणार आहे. 21 एप्रिल रोजी झालेल्या ईस्टर हल्ल्यानंतर संपू्रण श्रीलंकेत सोशल मीडियाद्वारे फेक न्यूज आणि द्वेष पसरवणारे भाषणे पसरविण्यात आले होते. यामुळे अनेक ठिकाणी मुस्लिम समुदायावर हल्ले झाले होते. यासाठी सरकारने फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअपला बेजबाबदारपणे हाताळण्याबाबत दोषी ठरवले होते.  

 

श्रीलंकेत परसणाऱ्या फेक न्यूज रोखण्यासाठी सरकारने सोशल मीडियावर 9 दिवसांची बंदी आणली होती. यादरम्यान इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आणि आरोपींचे व्हिडिओ आणि फोटो जारी केले होते. हे व्हिडिओ विविध माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर श्रीलंकेत युट्यूबवर बंदी आणली होती. 

 

सिंगापूरमध्ये मागील महिन्यात लागू करण्यात आला फेक न्यूज अॅक्ट

सिंगापूर सरकारने फेक न्यूज रोखण्यासाठी मागील महिन्यात एका कायदा पास केला. या कायद्याअंतर्गत फेट मजकूर किंवा बातम्या ब्लॉक करणे किंवा हटविण्याचे सरकार आदेश देऊ शकते. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याला 10 वर्षांचा तुरुंगवास आणि आर्थिक दंडाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...