आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंका : पंतप्रधान राजपक्षेंविरोधातील अविश्वास प्रस्ताव संसदेत पारित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलंबो -  श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाला सिरिसेना यांना तगडा झटका बसला आहे. देशाच्या संसदेने पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव बुधवारी मंजूर केला. सभापती कारू जयसूर्या यांनी सांगितले की, २२५ सदस्यीय संसदेने राजपक्षे यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव पारित केला.

 

यादरम्यान राजपक्षे समर्थकांनी घातलेल्या गोंधळात जयसूर्या यांनी या सरकारकडे बहुमत नसल्याचे जाहीर केले. सदस्यांनी आवाजी मतदानाने पंतप्रधानांविरुद्ध अविश्वास प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले. यासोबत दोन्ही सभागृहांचे कामकाज गुरुवारी १०.०० वाजेपर्यंत स्थगित केले. सभापती जयसूर्या यांनी १२२ सदस्यांच्या स्वाक्षऱ्यांचा दस्तऐवज राष्ट्राध्यक्ष सिरिसेना यांना पाठवला. घटनेनुसार पुढील कामकाज करण्याची विनंती सभापतींनी 
राष्ट्राध्यक्षांकडे केली.  


राष्ट्राध्यक्ष सिरिसेना यांनी २६ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना बडतर्फ करून राजपक्षे यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली होती. यानंतर ९ नोव्हेंबरला मुदतीच्या २० महिने आधी संसद भंग केली हाेती. मात्र, सर्वाेच्च न्यायालयाने मंगळवारी त्यांचा निर्णय घटनाबाह्य ठरवला होता. यानंतर बुधवारी संसदेचे अधिवेशन बोलावण्यात आले होते. राजपक्षे यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव पारित झाल्यानंतर रानिल विक्रमसिंघे म्हणाले, राष्ट्राध्यक्ष सिरिसेना यांनी त्यांच्या सरकारला घटनाबाह्य पद्धतीने बरखास्त केले होते. सरकार २६ ऑक्टोबरच्या आधीच्या स्थितीत कायम राहावे, अशी मागणी त्यांनी केली. श्रीलंका संसदेचा कार्यकाळ ऑगस्ट २०२० 
पर्यंत होता.  

 

चीनची चिंता वाढली, राजकीय स्थैर्याची अपेक्षा व्यक्त  
राजपक्षे यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव पारित झाल्यानंतर चीनने श्रीलंकेत राजकीय स्थैर्य कायम राहील, अशी आशा व्यक्त केली. चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग म्हणाले, श्रीलंकेतील स्थितीवर चीन लक्ष ठेवून आहे.

बातम्या आणखी आहेत...