आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रीलंकेचे राष्ट्रपती गौतबाया राजपक्षे यांचा भारत दौरा, पंतप्रधान मोदींशी तमिळ समुदायासहित अनेक मुद्द्यांवर चर्चा करणार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गौतबाया राजपक्षे नरेंद्र मोदींच्या निमंत्रणावर तीन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले आहेत
  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद शुक्रवारी गौतबाया यांच्या सन्मात औपचारिक जेवण देणार
  • एमडीएमकेच्या समर्थकांनी दिल्लीमध्ये राजपक्षे यांच्याविरुद्ध प्रदर्शन केले

नवी दिल्ली- श्रीलंकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती गौतबाया राजपक्षे तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. आज(शुक्रवार) राष्ट्रपती भवनात त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. गौतबाया यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. ते आज हैदराबाद हाउसमध्ये मोदींसोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. या दरम्यान दोन्ही नेते मदत आणि द्विपक्षीय संबंधांना मजबूत करण्यावर चर्चा करतील. तमिळ समुदाय, हिंद महासागराची स्थितिसहित अनेक मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते. याआधी गौतबाया यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली. राष्ट्रपती बनल्यानंतर गौतबाया यांचा हा पहिलाच दौरा आहे.परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या निमंत्रणावर श्रीलंकेचे राष्ट्रपती भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधाना गती मिळेल. गौतबाया यांनी पदभार स्विकारताच भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांची भेट घेतली. या महिन्यात झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीत गौतबाया यांनी विजय मिळवला. 

 

दिल्लीत एमडीएमके नेते वाइको आणि समर्थकांचे प्रदर्शन
 
गौतबाया यांच्या दौऱ्याविरुद्ध मारूमलार्ची द्रविड़ मुनेत्र कड़गम(एमडीएमके)चे नेते वाइको यांनी गुरुवारी दिल्लीतील समर्थकांसोबत प्रदर्शन केले.