आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंकेत राजकीय संकट: राष्ट्राध्यक्षांकडून संसद 16 नोव्हेंबरपर्यंत स्थगित; अर्थसंकल्पाचे सादरीकरणही पुढे ढकलले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलंबो - श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रिपाला सिरीसेना यांनी शनिवारी संसद निलंबित करण्याचे आदेश जारी केले आहेत. पंतप्रधानांना बरखास्त केल्यानंतर वाढत्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला. त्यांच्या आदेशानुसार, 225 सदस्य संख्या असलेल्या संसदेत 16 नोव्हेंबर पर्यंत कुठलेही अधिवेशन होणार नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे, श्रीलंकेत 5 नोव्हेंबर रोजी वार्षिक अर्थसंकल्प सादर केले जाणे अपेक्षित होते. परंतु, अर्थसंकल्पाचे सादरीकरण सुद्धा आता पुढे ढकलण्यात आले आहे. 
 

हे आहे कारण
श्रीलंकेत वाढत्या राजकीय वादानंतर राष्ट्राध्यक्ष मैत्रिपाला सिरीसेना यांनी पंतप्रधान रानिल विक्रमेसिंघे यांना शुक्रवारी पदच्यूत केले. त्याच आदेशाला आव्हान देत विक्रमेसिंघे यांनी संसदेचे आपातकालीन अधिवेश बोलावण्याचे आवाहन केले होते. या अधिवेशनात ते आपले बहुमत सिद्ध करणार होते. परंतु, ऐनवेळी राष्ट्राध्यक्षांनी संसदेला स्थगिती देऊन विक्रमेसिंघे यांना मोठा धक्का दिला. संसदेचे सभापती कारु जयसूर्या यांनी देशातील नागरिकांना शांत आणि संयमाने राहण्याचे आवाहन केले. सोबतच लवकरच राजकीय वादावर तोडगा काढला जाईल असे आश्वस्त केले. 


आंतरराष्ट्रीय समुदायाची करडी नजर
श्रीलंकेत आलेल्या राजकीय भूकंपावर आंतरराष्ट्रीय समुदाय करडी नजर ठेवून आहे. श्रीलंकेत युरोपियन संघाच्या राजदूतांनी परपिस्थितीवर आपले लक्ष आहे असे स्पष्ट केले. श्रीलंकेच्या राज्यघटनेनुसार या राजकीय अशांततेवर तोडगा काढला जाईल अशी अपेक्षा युरोपियन संघासह फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलंड्स, रोमानिया आणि ब्रिटनने व्यक्त केली आहे. या दरम्यान सरकारने हिंसाचार टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी असेही आवाहन करण्यात आले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...