आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवीचा हा चित्रपट पाहून तिच्या प्रेमात पडले होते बोनी कपूर, असे जवळ आले होते दोघे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


 

मुंबई : चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी आज हयात असत्या तर त्यांनी वयाची 55 वर्षे पूर्ण केली असती. पण याचवर्षी 24 फेब्रुवारी रोजी त्यांचे निधन झाले होते. श्रीदेवी आपल्या कुटुंबीयांसह दुबईत पती बोनी कपूर यांचा भाचा मोहित मारवाहच्या लग्न समारंभासाठी गेल्या होत्या. दुबईतच बॉलिवूडच्या चाँदणीने अखेरचा श्वास घेतला. 2 जून 1996 रोजी श्रीदेवी यांनी बोनी कपूर यांच्यासोबत लव्ह मॅरेज केले होते. 'सोलहवां सावन' चित्रपट पाहून बोनी कपूर श्रीदेवीच्या प्रेमात पडले असे म्हटले जाते. अशी होती या दोघांची लव्ह स्टोरी...

 

श्रीदेवी यांना भेटण्यासाठी चेन्नईला गेले, परंतु झाली नव्हती भेट...
बोनी श्रीदेवी यांना भेटण्यासाठी चेन्नईला गेले होते. परंतु श्रीदेवी सिंगापूरमध्ये असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. त्याचवेळी त्यांचा 'सोलहवा साल' हा पहिला सिनेमा रिलीज झाला. हा सिनेमा पाहून बोनी प्रभावित झाले आणि त्यांनी ठरवले, की ते निर्माता म्हणून श्रीदेवीसोबत सिनेमा करणार. एकेदिवशी सिनेमाच्या सेटवर बोनी श्रीदेवी यांची भेट घेण्यासाठी पोहोचले. पण श्रीदेवी यांनी त्यांची काम त्यांची आई पाहते, असा निरोप बोनी यांना दिला होता. 

 

दिली होती चित्रपटाची ऑफर
जेव्हा बोनी श्रीदेवी यांच्या आईला भेटले, तेव्हा त्या म्हणाल्या श्रीदेवी 'मि. इंडिया' सिनेमात काम करेल, परंतु तिचे मानधन 10 लाख रुपये असेल. बोनी यांनी उत्तर दिले, की ते 11 लाख रुपये देतील. श्रीदेवीच्या आईचा आनंद गगनात मावेना. अशाप्रकारे बोनी यांना आपल्या प्रेमाजवळ येण्याची संधी मिळाली. त्यांनी श्रीदेवी यांच्यासाठी सर्व स्पेशल सुविधा ठेवल्या. परंतु अजूनही त्यांचे प्रेम एकतर्फीच होतेच. कारण श्रीदेवी मिथुन चक्रवर्तीवर प्रेम करत होत्या. दुसरीकडे बोनी कपूर यांनी मोना कपूरसोबत अरेंज मॅरेज झाले होते. त्यानंतर मिथुन आणि श्रीदेवीच्या विभक्त झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या. बोनी यांनी पुन्हा श्रीदेवीसोबत जवळीक वाढवण्यास सुरुवात केली. एकदा बोनी श्रीदेवीला भेटण्यासाठी स्वित्झर्लंडला पोहोचले होते.

 

आईच्या आजारपणामुळे संपला होता दूरावा...
पुढे श्रीदेवी यांच्या आईंची प्रकृती बिघडली. 1995मध्ये त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करायची होती. श्रीदेवींच्या जीवनातील हा कठीण काळ होता. यावेळी बोनी कपूर यांनी त्यांना साथ दिली. जेव्हा बोनी कपूर यांना श्रीदेवी यांच्या आईच्या आजाराबद्दल कळलं तेव्हा ते चेन्नईला गेले. या शस्त्रक्रियेसाठी श्रीदेवी यांच्या आईंना अमेरिकेला नेण्यात आलं. बोनी कपूरही त्यांच्या सोबत होते. पण ही शस्त्रक्रिया चुकीच्या पद्धतीने झाली. त्यानंतर बोनी कपूर यांनी या हॉस्पिटवर दावा ठोकला. या प्रकरणात शेवटी हॉस्पिटलसोबत तडजोड होऊन हॉस्पिटलने 16 कोटी रुपयांची भरपाई दिली. कठीण काळात बोनी कपूर ज्या पद्धतीनं मदत करत होते, ज्या प्रकारे त्यांच्या आईची काळजी घेत होते ते श्रीदेवी यांनी जवळून पाहिलं. श्रीदेवी यांच्या वडिलांचं निधन पूर्वीच झालं होतं. त्यामुळं त्या आईच्या फार जवळ होत्या. आईच्या निधनानंतर 24 तास त्यांच्या घरी राहून श्रीदेवीला आधार देणारे बोनी कपूर हेच होते. या नात्याचं नंतर प्रेमात रूपांतर झालं. बोनी आणि मोना यांचे कमकुवत पडलेले नाते अखेर संपुष्टात आले. 1996मध्ये श्रीदेवी आणि बोनी यांनी लग्न केले.  

 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा श्रीदेवी आणि बोनी कपूर यांचे निवडक फोटो...

बातम्या आणखी आहेत...