आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sridevi 55th Birth Anniversary When Daughter Jhanvi Kapoor Says Sridevi Bad Mother

या कारणामुळे श्रीदेवीचा द्वेष करु लागली होती जान्हवी, म्हणाली होती - तू खूप वाईट आहेस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः श्रीदेवी यांची आज 55 वी बर्थ अॅनिव्हर्सरी आहे. 13 ऑगस्ट 1963 रोजी तामिळनाडूच्या शिवकाशी येथे त्यांचा जन्म झाला होता. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकलेल्या श्रीदेवी यांच्याशी निगडीत अनेक किस्से ऐकिवात आहेत, पण त्यांचा एक किस्सा त्यांच्याशी आणि त्यांची मुलगी जान्हवी हिच्याशी संबंधित आहे. हा किस्सा स्वतः श्रीदेवी यांनी एका मुलाखतीत सांगितला होता. 

 

जेव्हा सहा वर्षांच्या जान्हवीला आला होता आईला राग...  
- चाहत्यांसाठी या गोष्टीवर विश्वास ठेवणं कदाचित कठीण असेल, पण हे खरंय की जान्हवी आपल्या आईचा द्वेष करत होती. श्रीदेवी यांनी 50 वर्षांच्या करिअरमध्ये 300 हून जास्त सिनेमांमध्ये काम केले. पण जान्हवीने मात्र त्यांचे फक्त पाच सिनेमेच पाहिले आहेत. सहा वर्षांची असताना जान्हवीने श्रीदेवी यांचा 'सदमा' हा चित्रपट बघितला होता. 

- 'सदमा' पाहून तिला फारच धक्का बसला होता. या चित्रपटाच्या क्लायमॅक्सला श्रीदेवी बरी झाल्यानंतर ती कमल हसनला पुर्णपणे विसरते. चित्रपटाचा हा शेवट पाहून जान्हवीला एवढा राग आला होता की, ती दोन दिवस आईशी बोलली नव्हती.  आई कमल हसन यांच्यासोबत अशी वागूच कशी शकते याचा राग तिला आला होता. 

- आपल्या करिअरमध्ये 300 चित्रपटांमध्ये झळकलेल्या श्रीदेवी आता आपल्यात नाहीत. याचवर्षी 24 फेब्रुवारी रोजी दुबईतील एका हॉटेलमध्ये बाथटबमध्ये बुडाल्याने त्यांचे निधन झाले होते.

 

'जुली'द्वारे केले होते डेब्यू... 
श्रीदेवी यांनी 1975 मध्ये 'जुली' चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते. या चित्रपटात त्या बालकलाकाराच्या रुपात झळकल्या होत्या. 1983 साली आलेल्या 'हिम्मतवाला' या चित्रपटाने त्या एका रात्रीतून स्टार झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. श्रीदेवी अखेरच्या 'मॉम' या चित्रपटात झळकल्या होत्या. हा चित्रपट 7 जुलै 2017 रोजी रिलीज झाला होता. 

 

या चित्रपटांमध्ये झळकल्या श्रीदेवी... 
श्रीदेवी यांनी 'सोलहवां सावन' (1978), 'हिम्मतवाला' (1983), 'मवाली' (1983), 'तोहफा' (1984), 'नगीना' (1986), 'घर संसार' (1986), 'आखिरी रास्ता' (1986), 'कर्मा' (1986), 'मि. इंडिया' (1987), 'गुरु' (1989), 'चालबाज' (1989), 'चांदनी' (1989), 'जुदाई' (1997) सह 300 चित्रपटांमध्ये काम केले. शाहरुख खानच्या आगामी 'झिरो या चित्रपटात श्रीदेवींचा कॅमिओ प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...