आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिश्मा कपूरच्या सेरेमनीमध्ये मेंदी लावण्यासाठी बसल्या श्रीदेवी, मुलगी जान्हवीही दिसली, पण ओळखणे झाले कठीण, व्हायरल झाला जुना Video 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. दिवंगत अभिनेक्षी श्रीदेवींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्या दोन्ही हातांवर मेंदी काढताना दिसत आहेत. करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांच्या लग्नातील हा व्हिडिओ आहे. 2003 मध्ये झालेल्या या लग्नात श्रीदेवी 6 वर्षांची मुलगी जान्हवी कपूरसोबत पोहोचल्या होत्या. मेंदी सेरेमनीदरम्यान त्यांनी आपल्या दोन्ही हातांवर मेंदी काढली होती. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये जान्हवीला ओळखणे कठीण होतेय. 


आता एकत्र राहत नाही करिश्मा आणि संजय 
करिश्मा आणि संजय कपूर आता एकत्र राहत नाही. 2016 मध्ये या दाम्पत्याचा घटस्फोट झाला. दोघांना एक मुलगा कियान आणि मुलगी समायरा आहे. करिश्मासोबत घटस्फोट घेण्यादरम्यान संजयचे अफेअर प्रिया सचदेवसोबत सुरु झाले आणि एप्रिल 2018 मध्ये त्यांनी लग्न केले. याच्या 8 महिन्यांनंतर प्रियाने एका मुलाला जन्म दिला. तर करिश्मा कपूरचे नाव संदीप तोषनीवालसोबत जोडले जाते. 

बातम्या आणखी आहेत...