आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवी आणि रेखा यांचा दाक्षिणात्य सिनेसृष्टीकडून सन्मान, पत्नीचा अवॉर्ड स्वीकारताना भावूक झाले बोनी कपूर 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते अक्कीनेनी नागेश्वर राव यांच्या नावाने दिल्या जाणा-या ANR अवॉर्ड सोहळ्यात अलीकडेच भावूक क्षण बघायला मिळाले. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि रेखा या दोघींना या अवॉर्ड सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. श्रीदेवी यांचे पती आणि निर्माते बोनी कपूर यांनी त्यांच्या पत्नीचा पुरस्कार स्वीकारला. श्रीदेवी यांचा पुरस्कार स्वीकारताना बोनी कपूर यावेळी भावूक झाले होते. पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर आलेल्या बोनी यांनी यावेळी श्रीदेवींच्या आठवणींना उजाळा दिला. श्रीदेवीविषयी बोलताना त्यांचे डोळे पाणावले होते. 

श्रीदेवी यांच्यासह अभिनेत्री रेखा यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. रेखा यांनीदेखील श्रीदेवींच्या आठवणींना उजाळा दिला.

  श्रीदेवी यांनी वयाच्या चौथ्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यांनी दक्षिणेसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईत त्यांचे निधन झाले होते. 

बातम्या आणखी आहेत...