आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवींच्या शेवटच्या करवा चौथ सेलिब्रेशनचे फोटोज व्हायरल, सर्वांनासोबत श्रीदेवीने केले होते सेलिब्रेशन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. अनुष्का शर्मा, नेहा धूपिया आणि सोनम कपूर लग्नानंतर यावर्षी पहिले करवा चौथ सेलिब्रेट करत आहेत. याच काळात सोशल मीडियावर दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या शेवटच्या करवा चौथचे फोटोज व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये दिसतेय की, श्रीदेवीने उत्साहात करवा चौथचे सेलिब्रेशन केले होते. श्रीदेवी यांनी आपल्या मैत्रिणींसोबत सेलिब्रेशन केले होते. समोर आलेल्या फोटोजमध्ये श्रीदेवी आपल्या जाऊ सुनीता कपूर, महीप कपूर, फ्रेंड शिल्पा शेट्टी, रवीना टंडन, नीलमसोबतच कपूर फॅमिलीच्या महिलांसोबत करवा चौथ सेलिब्रेट करत आहेत. गेल्यावर्षी श्रीदेवीने करवा चौथचे फोटोज आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरही शेअर केले होते. 

डिझायनरल वीना नागदाकडून मेंदी काढून घेत होत्या श्रीदेवी 
- श्रीदेवी करवा चौथची मेंदीही खास असायची. त्या दरवर्षी करवा चौथला डिझायनर वीना नागदाकडून मेंदी काढून घ्यायच्या.
- वीनाने एका मुलाखतीत सांगितले होते की, "श्रीदेवी माझ्याकडून प्रत्येकवर्षी करवा चौथला मेंदी काढून घ्यायच्या. खुशी आणि जान्हवीलाही आईप्रमाणेच मेंदी काढण्याची आवड आहे. जान्हवी दोन-तीन वर्षांची होती, तेव्हापासून मी श्रीदेवीला मेंदी काढत आहे."

बातम्या आणखी आहेत...