• Home
  • News
  • Sridevi Daughter Khushi Kapoor leaves for New York to study

Bollywood / आता अभिनयाचे धडे घेण्यासाठी खुशी कपूर न्यूयॉर्कला रवाना, वडिलांचा निरोप घेताना भावुक झाली

अभिनयाचे धडे घेण्यासाठी खुशी कपूर न्यूयॉर्कला रवाना

दिव्य मराठी वेब

Sep 11,2019 11:25:00 AM IST

बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशी कपूर मंगळवारी सकाळी यूएसला रवाना झाली. खुशी यूएसच्या प्रसिद्ध न्यूयार्क फिल्म अॅकडमी मधून दोन वर्षाचा कोर्स करून भारतात परतणार आहे. नंतर चित्रपटात पदार्पण करणार आहे. यावेळी वडील बोनी कपूर आणि त्यांचे काही जवळचे मित्र तिला सोडण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहोचले होते.


खुशीने जेव्हा वडिलांचा निरोप घेतला आणि विमानतळाच्या आत जाऊ लागली तेव्हा ती भावुक झाली होती. यावेळी खुशीची काकू आणि संजय कपूरची पत्नी महिप कपूर यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आणि लिहिले की, 'कॉलेजसाठी रवाना.. तुझी आठवण येईल'

X
COMMENT