आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BOX OFFICE वर 72 कोटी कमावणा-या 'धडक'ची सक्सेस पार्टी: स्किन टाइट ड्रेसमध्ये दिसली जान्हवी, धाकट्या बहिणीचाही दिसला ग्लॅमरस लूक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जान्हवी कपूर, करण जोहरसोबत खुशी कपूर - Divya Marathi
जान्हवी कपूर, करण जोहरसोबत खुशी कपूर

एंटरटेन्मेंट डेस्कः जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर स्टारर 'धडक' या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचे गुरुवारी रात्री मुंबईत आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत अभिनेत्री जान्हवी कपूर ब्लॅक कलरच्या स्किन टाइट शॉर्ट ड्रेसमध्ये स्पॉट झाली. न्यूड मेकअपसोबत जान्हवीने केस मोकळे सोडले होते. पार्टीत जान्हवीची धाकटी बहीण खुशी कपूरसुद्धा पोहोचली होती. खुशीसुद्धा ब्लॅक कलरच्या आउटफिटमध्ये दिसली. तिने हाय वेस्ट पँट आणि स्लीवलेस क्रॉप टॉप परिधान केला होता. पार्टीत जान्हवी आणि खुशी कायम सोबत दिसल्या. दोन्ही बहिणींचा लूक अतिशय सुंदर होता. पार्टीत या दोघी बहिणी लाइमलाइटमध्ये राहिल्या. जान्हवीचा पहिला वहिला चित्रपट असलेल्या धडकने बॉक्स ऑफिसवर 72 कोटींची कमाई केली आहे. 

 

करण जोहर-खुशीची दिसली खास बाँडिंग... 

- सक्सेस पार्टीत करण जोहर आणि खुशी यांची खास बाँडिंग लक्ष वेधून गेली. दोघे बराच वेळ एकत्र गप्पा मारताना दिसले. 
- पार्टीत 'धडक'चे दिग्दर्शक शशांक खेतान, ईशान खट्टर, करण जोहरसह अनेक सेलेब्स उपस्थित होते.
- 'धडक' या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 72 कोटींची कमाई केली, तर वर्ल्डवाइड कमाईचा आकडा 100 कोटींहून अधिकचा झाला आहे. जान्हवी आणि ईशान यांचा 'धडक' हा चित्रपट मराठीतील ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'सैराट' या चित्रपटाचा रिमेक आहे. धडकनंतर जान्हवीने करण जोहरचा दुसरा चित्रपट साइन केला आहे. आगामी 'तख्त' या चित्रपटात जान्हवी झळकणार आहे. तिच्यासह रणवीर सिंह, आलिया भट, करीना कपूर, विक्की कौशल, भूमी पेडनेकर, अनिल कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका यात असतील. हा चित्रपट 2020 मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. 

 

पुढील स्लाईड्सवर बघा, धडकच्या सक्सेस पार्टीत क्लिक झालेले खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...