आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवी : प्रकाशित पुस्तक आणि बायोपिक

2 वर्षांपूर्वीलेखक: जयप्रकाश चौकसे
  • कॉपी लिंक

सत्यार्थ नायक यांनी श्रीदेवीच्या जीवनावर आणि अभिनीत चित्रपटांवर एक पुस्तक लिहिले आहे. त्याच्या प्रकाशन सोहळ्यात बोनी कपूर भावुक झाले होते. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी श्रीदेवी ने ‘ज्युली’ या चित्रपटात नायिकेच्या लहान बहिणीची भूमिका केली होती आणि अमोल पालेकर यांच्यासोबत ‘सोलहवा सावन’ चित्रपटात नायिकेची भूमिका केली होती. पण तिला हिंमतवाला या चित्रपटामधून यश मिळाले. श्रीदेवीने तिच्या समकालीन अभिनेत्री जयाप्रदाबरोबर ‘तोहफा’ मध्ये भूमिका केली होती. या दोन बहिणींचा हा चित्रपट राज कपूर, वैजयंतीमाला आणि उषा किरण अभिनीत ‘नजर’ चित्रपटाचा रिमेक होता. दोन बहिणींच्या त्याच कथेतून प्रेरणा घेऊन ‘बहारें फिर भी आयेंगी’ नावाचा एक चित्रपट गुरुदत्त तयार करत होते, पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या भावाने हा चित्रपट पूर्ण केला. श्रीदेवीने तिच्या दुसऱ्या टप्प्यात गौरी शिंदे दिग्दर्शित इंग्लिश विंग्लिश आणि बोनी कपूर निर्मित मॉम या चित्रपटात भूमिका साकारल्या. दोन्ही चित्रपट यशस्वी झाले. मॉमच्या एका दृश्यात नायिकेने तृतीयपंथी लोकांची मदत घेऊन एकाची हत्या केली होती, जो तिच्या मुलीवर  बलात्कार करतो. पटकथेमध्ये श्रीदेवीने हा प्रसंग सुचवला असेल काय? एकदा मला फ्लाइट पकडण्यासाठी जावं लागलं. त्या वेळी फक्त श्रीदेवीची कार उपलब्ध होती. ट्रॅफिक सिग्नलवर गाडी थांबताच तृतीयपंथी पैसे मागण्यासाठी येतात. तिच्या चालकाने सांगितले की श्रीदेवी नेहमीच तृतीयपंथी लोकांना खूप मदत करायची. एका पुरस्कार वितरण समारंभात श्रीदेवी तिच्या अभिनीत चित्रपटातील नृत्य सादर करणार होती. पंधरा दिवस डान्स मास्टरला घरी बोलावून त्याचा सराव केला. चित्रपटातील नृत्याच्या शूटिंगच्या वेळी ती आधीच चांगला सराव करायची. ती नेहमीच सर्वोत्कृष्टपणे  नृत्य सादर करायची. कोणतेही काम कोणत्याही प्रकारे हाताळण्याची तिचा प्रवृत्ती नव्हती. हेमा मालिनी, धर्मेंद्र आणि संजीव कुमार अभिनीत ‘सीता और गीता’ चित्रपटाद्वारे प्रेरित ‘चालबाज’ चित्रपटात श्रीदेवीने डबल रोल साकारला होता. रजनीकांत आणि सनी देओल या चित्रपटातील मुख्य पात्र होते. एका बातमीनुसार, जुळ्या मुलींच्या अशाच एका चित्रपटात तापसी पन्नू अभिनय करणार आहे. सीता और गीता हा राम और श्याम अभिनीत दिलीप कुमार यांनी जुळ्या भावांची भूमिका साकारलेला चित्रपट आहे. दक्षिण भारतात निर्मित झालेला राम और श्याम हा महाराष्ट्रातील एका चित्रपट निर्मात्यास समर्पित केला आहे. चित्रपट उद्योग नेहमीच संकीर्ण प्रादेशिकतेपासून मुक्त राहिला आहे. श्रीदेवीने वयाच्या सातव्या वर्षांपासून अखेरपर्यंत अभिनय केला. ती शिस्तप्रिय आणि अतिशय कष्टाळू  महिला होती. तिच्या आईने चेन्नईमधे प्रचंड संपत्तीचा संचय केला आहे. आजच्या काळात श्रीदेवी यांची संपत्ती ही पाचशे कोटींपेक्षा अधिक आहे.  श्रीदेवीच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्या चेहऱ्यावर असणारे  लहान मुलासारखे निरागसतेचे भाव होते.  चित्रपट निर्माते शेखर कपूरच्या ‘मि. इंडिया’ या चित्रपटात तिच्या अभिनयाची झलक दिसून येते. शास्त्रीय नृत्याचा अभ्यास केल्यामुळे श्रीदेवीचा चेहरा आणि शरीराचा बांधा हा उत्कृष्ट होता. भारतीय चित्रपटसृष्टीत देविका राणीपासून प्रियंका चोप्रा आणि दीपिका पदुकोण असे असंख्य कलाकार आहेत. या तारकांच्या जगात श्रीदेवीचे स्वतःचे खास स्थान आहे. ती एक इच्छाशक्ती असणारी अभिनेत्री होती आणि वेगवेगळ्या भूमिका घेत अभिनय करणारी होती.