आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Sridhar Are 80% Handicapped; They Are Taking Health And Education Responsibility Of 100 Children With Disabilities

वजन वाढू नये म्हणून बालपणापासूनच कमी खाल्ले, शौचही रोखायचे; नवे शैक्षणिक धोरण तयार करण्यात मोठी भूमिका

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • ८०% दिव्यांग आहेत श्रीधर; १०० दिव्यांग मुलांच्या आरोग्य, शिक्षणाची जबाबदारी
  • दिव्यांग मुलांच्या नोकरीसाठी व्होकेशनल कोर्स सुरू करतील

अमितकुमार निरंजन

नवी दिल्ली - जगात अनेक जण लहानशा अपयशाने खचून जातात. तर, काही त्याला आव्हान म्हणून त्याचा स्वीकार करतात. असेच व्यक्तिमत्त्व आहे एम. के. श्रीधर, लहानपणापासूनच ८०% दिव्यांग आहेत. ६५ वर्षांच्या श्रीधर यांनी देशाच्या नवीन शैक्षणिक धोरण ठरवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. आंध्र प्रदेशातील हिंदूपूरमध्ये जन्मलेले श्रीधर यांनी शारीरिक अक्षमता, अडथळे असून संघर्ष करत शिक्षण घेतले, बंगळुरूतून पीजी व मैसूर विद्यापीठात पीएचडी केली. १९९९ मध्ये तेथेच प्राध्यापक झाले. श्रीधर सांगतात की, ४ वर्षांचे असताना कमतरतेची माहिती झाली. बंगळुरूत फिजियोथेरपी, इलेक्ट्रिक शॉक सारखे उपचार केले. याचा शिक्षणावरही परिणाम होत होता. दरम्यान, चेन्नईतील एका संस्थेची माहिती मिळाली, १९६३ मध्ये तेथे गेलो. १४ वर्षांचा होईपर्यंत नऊ शस्त्रक्रिया झाल्या होत्या. त्यानंतर हिंदूपूरला परतलो. त्या वेळेपर्यंत व्हीलचेअर नव्हती. तोपर्यंत मी जमिनीवर हाताच्या आधारे चालायचो. शाळेत शौचास आल्यास ती रोखायचो. घरी येऊन शौचास जायचो. पाणी कमी प्यायचो. आई नेहमीच सांगायची की जेवणावर नियंत्रण ठेव, जास्त खाशील तर वजन वाढेल. तू दुसऱ्यांसाठी ओझे होशील.ते म्हणाले की, लहानपणी जे कष्ट सहन केले, ते दुसऱ्यांना होऊ नयेत म्हणून संस्था उघडली. यात दिव्यांग मुलांचा उपचार, शिक्षण, संरक्षणाची व्यवस्था आहे. येथे विद्यार्थी सहावी ते पदवीपर्यंतचे शिक्षण घेतात. देशभरातील १०० दिव्यांग मुलांनी याचा फायदा घेतला आहे. त्यांना नोकरी मिळावी यासाठी नवीन वर्षात व्होकेशनल कोर्स सुरू करू.४० जणांशी रोज बोलणे, ५० बैठका, ४ लाख सल्ले, तेव्हा झाला मसुदा

माझ्याकडे नव्या धोरणाच्या समन्वयाची जबाबदारी होती. रोज सुमारे ४० लोकांसोबत बोलणे व्हायचे. दोन महिन्यांत एक वेळा सर्व सदस्य भेटायचे. ५० पेक्षा जास्त बैठका झाल्या. सुमारे ४ लाख सल्ले आले. यात मला खूप मजा आली. अनेक तास काम केले. या सर्व कामात नरसिंहा सावलीसारखा सोबत राहिला.