• Home
  • National
  • Srinagar IAF Chopper Crash, Five Indian Air Force officers found guilty

National / एमआय-17 क्रॅशप्रकरणी वायुसेनेचे 5 अधिकारी दोषी, भारतीय हेलिकॉप्टरला पाकिस्तानी मिसाइल समजून उडवले होते


या अपघातात वायुसेनेच्या 6 अधिकाऱ्यांसहित एका सामान्य नागरिकाचा मृत्यू झाला होता

Aug 23,2019 05:11:01 PM IST

नवी दिल्ली- श्रीनगरच्या बडगाममध्ये 27 फेब्रुवारीला झालेल्या एमआय-17 हेलिकॉप्टर क्रॅश प्रकरणात वायुसेनेच्या कोर्टाने 5 अधिकाऱ्यांना दोषी करार दिले आहे. या अपघातात वायुसेनेच्या 6 अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. हा अपघात स्पायडर एअर डिफेंस मिसाइल सिस्टीममधून केलेल्या फ्रेंडली फायरमुळे झाला.


हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स चोरी झाल्यामुळे तपासात झाला उशीर
वृत्त संस्थेने सांगितल्यानुसार, कोर्टाने एक ग्रुप कमांडर, दोन विंग कमांडर आणि दोन फ्लाइट लेफ्टिनंटला या अपघातात दोषी करार केले आहे. त्यांना निष्काळजीपणा आणि प्रोटोकॉलचे पालन न केल्यामुळे दोषी ठरवले, ज्यामुळे हेलिकॉप्टर क्रॅश झाले होते. वायुसेनेने एअर कॉमोडोर रँकच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी दिली होती. यादरम्यान हेलिकॉप्टर ज्या गावात क्रॅश झाले, त्या गावातील लोकांनी त्यातील ब्लॅक बॉक्स चोरी केल्यामुळे आणि तपासासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांच्या वाहनावर दगडफेक झाल्याने चौकशीत थोडा उशीरही झाला होता.


टेकऑफनंतर 10 मिनीटात क्रॅश झाले होते हेलिकॉप्टर
चौकशीत समोर आले की, श्रीनगर एअरबेसवर एअर डिफेंसची जबाबदारी सांभाळत असलेले अधिकाऱ्यांना हे एमआय-17 वी-5 हेलिकॉप्टर बेसकेड येत असलेली मिसाइल वाटले आणि त्यांनी एअर डिफेन्स सिस्टीमने त्याला उडवले, पण मुळात हे हेलिकॉप्टर एका मिशनवरुन परतत होते. 27 फेब्रुवारीला श्रीनगरच्या 154 हेलिकॉप्टर यूनिटचे हेलिकॉप्टर टेकऑफनंतर 10 मिनीटात क्रॅश झाले होते. अपघातात 6 वायुसेनेच्या अधिकाऱ्यांशिवाय एका सिविलियनचा मृत्यू झाला होता. या दरम्यान, 100 किलोमीटर दूर भारतीय आणि पाकिस्तानच्या विमानांमध्ये युद्ध सुरू होते, ज्यात विंग कमांडर अभिनंदन होते.

X