आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साताऱ्यात उदयनराजेंविराेधात राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा लाेकसभा पाेटनिवडणूक व सातारा- जावळी विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार अनुक्रमे उदयनराजे व शिवेंद्रसिंह राजे भाेसले यांनी मंगळवारी साताऱ्यात शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. - Divya Marathi
सातारा लाेकसभा पाेटनिवडणूक व सातारा- जावळी विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार अनुक्रमे उदयनराजे व शिवेंद्रसिंह राजे भाेसले यांनी मंगळवारी साताऱ्यात शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले.

सातारा : सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार उदयनराजे भाेसले व सातारा- जावळी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी मंगळवारी शहरात शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. उदयनराजेंनी राष्ट्रवादीच्या खासदाकीचा राजीनामा दिल्यामुळे या मतदारसंघात पाेटनिवडणूक हाेत आहे. त्यांच्याविराेधात आता राष्ट्रवादीकडून माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. ३ ऑक्टाेबर राेजी ते अर्ज भरणार आहेत.

लोकसभेसाठी उदयनराजे यांच्या विरोधात कोण मैदानात उतरणार याबाबत बराच खल सुरू होता. प्रारंभी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. मात्र, त्यानंतर ही जागा काँग्रेसला सोडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण निवडणूक लढवणार असल्याची चर्चा झाली. मात्र, चव्हाण यांनी नकार दिला. ते कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातूनच विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी सकाळी श्रीनिवास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे आता गुरुवारी श्रीनिवास पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उदयनराजेंच्या विरोधात श्रीनिवास पाटील अशी ही रंगतदार लढत आता पाहायला मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...