आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एंटरटेन्मेंट डेस्क : रियलिटी शो 'Bigg Boss 12' ची कंटेस्टंट आणि टीव्ही अभिनेत्री सृष्टी रोडे आणि तिचा भावी पती मनीष नागदेव यनाच्यामध्ये वाद झाल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. असे सांगितले जाते आहे कि सृष्टी आणि मनीषमध्ये वादाचे कारण अभिनेता रोहित सुचांती आहे, जो सृष्टीसोबत 'बिग बॉस 12' मध्ये होता. असे म्हण्टले जात होते की, सृष्टी, मनीषसोबतचे आपले नाते विसरून रोहितच्या जवळ गेली होती. रोहितने सर्व अफवांवर आता मौन तोडले आहे. एका एंटरटेन्मेंट साईटला दिलेल्या इंटरव्यूमध्ये रोहितने सांगितले की, सृष्टी आणि तो केवळ चांगले मित्र आहेत आणि ते कोणत्याही रोमांटिक रिलेशनशिपमध्ये नाहीत. पर्सनल लाइफमध्ये तिला काय हवे आहे हा सर्वस्वी तिचा निर्णय आहे. सृष्टी खूप सेंसीबल आणि स्मार्ट मुलगी आहे. बिग बॉसच्या नंतर आम्ही केवळ न्यू ईयरला भेटलो.
शोमध्ये सृष्टी आणि रोहितला एकमेकांच्या खूप जवळ जवळ पहिले गेले होते. दोघांची ही जवळीक खूप चर्चेतही होती.
मनीषने केले सृष्टीला अनफॉलो...
- मनीष नागदेवने सृष्टीला इंस्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. त्यानंतर हे जवळजवळ निश्चितच झाले आहे कि आता त्यांचे नाते तुटले आहे. मात्र, सृष्टीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अजूनही मनीषसोबतचे तिचे फोटोज तसेच आहेत. तसेच सृष्टी किंवा मनीषकडून अजून कुठलेही ऑफिशियल स्टेटमेंट आलेले नाही.
कधी सृष्टीच्या मैत्रिणीचा बॉयफ्रेंण्ड होता मनीष...
- टीव्ही अभिनेत्री आणि सृष्टीची मैत्रीण मुस्कान अरोराने काही वर्षांपूर्वी सृष्टीवर फसवल्याचा आरोप लावला होता. सृष्टीवर हा आरोप मनीषमुळे लागला होता. मनीष मुस्कानला फसवत होता.
- DainikBhaskar.com सोबत बातचीत करताना मुस्कानने सांगितले, "मी आणि मनीष रिलेशनशिपमध्ये होतो. मी त्यावेळी 'महाराणा प्रताप' सीरियल करत होते. या शूटिंगसाठी मला वापीला जावे लागायचे. जे मुंबईहुन 4 तासांच्या अंतरावर आहे. सीरियलसाठी मला खूप ट्रॅव्हल करावे लागत होते. त्याचदरम्यान मला कळले की, मनीष आणि माझी एक मैत्रीण आस्था चौधरी यांच्यामध्ये जवळीक वाढत आहे. मनीष माझ्याशी खोटे बोलत होता. पण एक दिवस मी त्याला रंगे हात पकडले. मात्र, या घटनेनंतर त्याने माझी माफी मागितली आणि मी त्याला शेवटची एक संधी दिली होती. काही दिवसानंतर मी हॉस्पिटलमध्ये एडमिट झाले. आणि दोन दिवसानंतरच मला कळले की, सृष्टी रोडेला डेट करत आहेत. मला खूप वाईट वाटले. मी सृष्टीला कॉल केला, पण तिने मला असे काहीच नाही म्हणून सांगितले. मी तिच्यावर विश्वास ठेवला. पण काही दिवसानंतर त्यांचे रिलेशनशिप कंफर्म झाले. सृष्टीने मला फसवले"
2017 मध्ये झाला होता मनीष आणि सृष्टीचा साखरपुडा...
- 3-4 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 2017 मध्ये सृष्टी आणि मनीषने साखरपुडा केला होता. जेव्हा सृष्टी 'बिग बॉस' मध्ये होती. तेव्हा मनीषने एका इंटरव्यूमध्ये सांगितले, "आमची रोका सेरेमनी अली आहे. जशी ती 'बिग बॉस' च्या घराबाहेर आली, आम्ही डेट फायनल करून लग्न करणार आहोत"
- 'बेगूसराय', 'मधुबाला', 'पवित्र रिश्ता' सारख्या टीव्ही सीरियलमध्ये काम केलेल्या मनीष 2013 मध्ये तेव्हा चर्चेत होता जेव्हा टीनए स्पर्म डोनेट केले होते. चेन्नईच्या एका फॅनने त्याला सोशल मीडियावर त्याला तसे करण्याची विनंती केली होती.
- सोशल मीडियावर त्याचा एक फॅन म्हणाला लवकरच माझे लग्न होणार आहे. पण तो गंभीर फर्टलिटी प्रॉब्लमचा सामना करत आहे आणि भविष्यात कधीही पिता बनू शकत नाही. फॅनने म्हणाला की, त्याला त्याचा लुक आणि अक्टिंग खूप आवडते आणि त्याला त्याच्यासारखाच मुलगा हवा आहे. मनीषने पहिले चेष्टा समजून इग्नोर केले, पण फॅनने केलेल्या खूप विनंतीमुळे आणि त्याच्या आनंदासाठी स्पर्म डोनेट केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.