Home | Maharashtra | Pune | ssc exam start from today maharashtra

बेस्ट ऑफ लक : इयत्ता दहावीच्या परीक्षेला राज्यात आजपासून प्रारंभ

प्रतिनिधी | Update - Mar 01, 2019, 09:32 AM IST

दहावीच्या विद्यार्थी संख्येत पन्नास हजारांनी घट

 • ssc exam start from today maharashtra

  पुणे - राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला १ मार्चपासून सुरुवात होत आहे. परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत यंदा पन्नास हजारांनी घट झाल्याची माहिती मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी दिली.
  यावर्षी नऊ विभागीय मंडळांकडून १७ लाख ८१३ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होणार आहेत. त्यामध्ये पुनर्रचित अभ्यासक्रमाचे (नवा अभ्यासक्रम) १६ लाख, ४१ हजार, ५६८ विद्यार्थी असून, जुन्या अभ्यासक्रमाचे ५९ हजार २४५ विद्यार्थी समाविष्ट आहेत.


  अशी घ्या काळजी
  - परीक्षेसाठी तयार राहा.
  - व्यवस्थित झोप घ्या.
  - साहित्य व्यवस्थित तयार ठेवा.
  - वेळेपूर्वी परीक्षा केंद्रावर हजर राहा.
  - सकारात्मक विचार करा.
  - दुसरे काय करतात यावर लक्ष देऊ नका.
  - पेपर सोडवताना घड्याळावर लक्ष ठेवा.
  - जुन्या मार्कांची तुलना करू नका.
  - ऐनवेळी नव्या गोष्टी अभ्यासण्यात आपला वेळ घालवू नका, यापूर्वी वर्षभर अभ्यासलेल्या गोष्टींचीच उजळणी करा.

Trending