आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोकणात जाणारी एसटी जळून खाक, ५७ गणेशभक्त वाचले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायगड - मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील माणगावजवळ वडपाले येथे रविवारी (१ सप्टेंबर) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एसटी बस जळून खाक झाली. सुदैवाने या दुर्घटनेत ५७ प्रवाशांचा जीव वाचला. या वेळी महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली होती. ही बस गणेश भक्तांना घेऊन मुंबईतील परळ येथून रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथे चालली होती. बसला आग लागताच प्रवाशांची एकच धांदल उडाली. चालकाने प्रसंगावधान राखत प्रवाशांना बसबाहेर काढले. त्यामुळे ते थोडक्यात बचावले, मात्र त्यांचे सामान जळून खाक झाले. अपघातानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ रोखून धरण्यात आली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती, रात्री उशीरापर्यंत हा महामार्ग वाहतूक कोंडीने व्यापला हाेता.

बातम्या आणखी आहेत...