Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | ST bus and truck accident, Twenty-three passengers were injured in the accident

 ओव्हरटेक करताना एसटी बस व ट्रकची समोरासमोर धडक; एसटी जळाली, होरपळल्याने २३ प्रवासी जखमी

प्रतिनिधी, | Update - Jul 10, 2019, 09:32 AM IST

नगर-औरंगाबाद मार्गावर बीटीआरसमोरील घटना

  • ST bus and truck accident,   Twenty-three passengers were injured in the accident

    नगर - ओव्हरटेक करताना एसटी बस व ट्रकची समोरासमोर धडक होऊन २३ प्रवासी जखमी झाले. ही घटना मंगळवारी पहाटे नगर-औरंगाबाद रस्त्यावरील बीटीआर गेटसमोर घडली. दोन्ही वाहनांची धडक एवढी जोराची होती की, बसने लगेचच पेट घेतला. अग्निशमन दल, तोफखाना, भिंगार कॅम्प पोलिस व नागरिकांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले.


    औरंगाबादहून पुण्याकडे निघालेली बस समोरून येणाऱ्या ट्रकवर धडकली. बसमध्ये त्यावेळी २८ प्रवासी होते. पहाटेची वेळ असल्याने बसमधील बहुतांश प्रवासी झोपेत होते. नेमके काय झाले, हे समजण्याच्या आतच बसने पेट घेतला. बसचा दरवाजा लवकर न उघडल्याने प्रवाशांना बाहेर पडण्यास अडचण येत होती. त्यापैकी २३ जण होरपळलेे. एसटी बस व ट्रकचा चालक दोघे गंभीर जखमी झाले. या अपघातामुळे नगर- औरंगाबाद रस्त्यावरील वाहतूक काही वेळ थांबली होती. भिंगार कॅम्प पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Trending