आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीत एसटी प्रवास भाडे १० टक्के महागले; १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर दरम्यान लागू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- दरवर्षीप्रमाणे दिवाळीच्या गर्दीच्या हंगामात एसटीने तिकीट दरात सरसकट १० टक्के भाडेवाढ केली आहे. १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर हे २० दिवस ही वाढ लागू असेल. मागील वर्षी याच काळात सेवाप्रकारानुसार २०, १५ आणि १० टक्के अशी भाडेवाढ केली होती. यंदा मात्र सर्व सेवा प्रकारात एकसमान अशी १० टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे. 


एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सूत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीने ३०% पर्यंत भाडेवाढीचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना दिला आहे. त्यानुसार दरवर्षी गर्दीच्या हंगामात (दिवाळी सुटीत) तात्पुरती भाडेवाढ केली जाते. यंदा यानुसारच सेवा प्रकारनिहाय २०, १५ व १०% अशी भाडेवाढ न करता सर्व सेवा प्रकारांसाठी केवळ २० दिवसांसाठी सरसकट १०% भाडेवाढ केली आहे. ही भाडेवाढ ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होईल. 

बातम्या आणखी आहेत...