Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | ST buses crowd; Ten percent fare, private vehicle services will be expensive

भाऊबीजेपूर्वीच एसटी बसेसना गर्दी; दहा टक्के भाडेवाढ, खासगी वाहनसेवा महागली

प्रतिनिधी | Update - Nov 08, 2018, 11:52 AM IST

एसटी बसेस लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही फुल्ल झाल्या होत्या.

 • ST buses crowd; Ten percent fare, private vehicle services will be expensive

  धुळे - शहरात सायंकाळी सहा ते साडेअाठ वाजेच्या सुमारास मुहूर्त साधत घराेघरी लक्ष्मीपूजन झाले. त्याचवेळी फटाक्यांची एकच बरसात झाली. लाखाे अाकाशकंदिलांच्या सान्निध्यात फटाक्यांची अातषबाजी झाल्याने शहर प्रकाशाने उजळून निघाले. दहा वाजेच्या अात शहरभरात फटाक्यांची अातषबाजी झाली. दरम्यान भाऊबीजेसाठी जाणाऱ्यांची गर्दी वाढली असून, एसटी बसेस लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही फुल्ल झाल्या होत्या.


  दीपावली पर्वात लक्ष्मीपूजनाला शहरात सायंकाळी आग्रा रोडवरील दुकान, शोरूम, सोन्या-चांदीच्या दुकानांमध्ये मुहूर्तावर पूजन करण्यात आले. लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधत अनेकांनी सायंकाळी ६ वाजून १ मिनिटापासून रात्री ८ वाजून ३३ मिनिटे या कालावधीत लक्ष्मीपूजन केले. सायंकाळपासून लक्ष्मीपूजनाची तयारी होऊन ते विधिवत करण्यात आले. या कालावधीत काही वेळ आग्रा रोडवरील वर्दळही थांबलेली होती. त्याचवेळी रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी अाकाशात दिसत हाेती. लाखाे फटाक्यांच्या आतषबाजीने सारा आसमंत उजळून निघाला.

  आकाशातही प्रकाशाच्या चंदेरी लकेर उमटत होत्या. त्यात घरोघरी अंगणात काढलेल्या आकर्षक रंगीबेरंगी रांगोळ्यांनी दीपावलीच्या आनंदात भर घातली होती. घरांवर विविध प्रकारचे आकर्षक आकाशकंदील सर्वांनी उंच टांगले होते. तर उंच इमारती व घरांवर आकर्षक रंगीबेरंगी लाइटिंग करण्यात आली होती. त्यामुळे शहरात मुख्य रस्त्यावर व गल्लीबोळात सर्वत्र दिव्यांचा झगमगाट झालेला होता.


  मंदिरांवरही रोषणाई व पणत्यांच्या माध्यमातून रोषणाई करण्यात आली हाेती. अशा प्रकारे सायंकाळपासूनच सर्वत्र दिवे लाइटिंग व पणत्यांच्या प्रकाशाने संपूर्ण शहरातील रस्ते, चौक उजळून निघाले होते. शहरातील गल्ली व वसाहतीत घरांवर नजर टाकली असता संपूर्ण दिव्यांची मांदियाळी दृष्टीस पडत होती. लक्ष्मीपूजनानिमित्त बाजारपेठेत लाखोंची उलाढाल; नवी वाहने आली घरी... शहरातून दिवाळी तसेच भाऊबीजसाठी बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने बसेसना अशी गर्दी झाली.

  एसटीलाच पसंती...

  दिवाळीच्या पर्वात एसटी महामंडळाने दि. २० नोव्हेंबरपर्यंत तिकिटांची दहा टक्के हंगामी दरवाढ केली आहे. एसटी महामंडळाने धुळे विभागातून माहूरगड, सोलापूर, पंढरपूर, शेगाव, सातारा,पुणे, तुळजापूर, वाशिम, नाशिक, औरंगाबाद, चोपडा, शिर्डी, जामनेर या मार्गावर जादा बसेस सुरू केल्या आहेत. लांब पल्ल्याच्या जादा फेऱ्यांचे १३ हजार ७९० किलोमीटर तर प्रादेशिक अंतरावर पाच हजार ६२ किलोमीटरचे नियोजन करण्यात अाले.

Trending