आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी चालक, वाहक, सहायक, शिपायांना लिपिकपदी पदोन्नतीस २५% आरक्षण : रावते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - एसटी महामंडळातील चालक, वाहक, सहायक, शिपाई तत्सम पदावरील कर्मचाऱ्यांना लिपिक-टंकलेखक पदावर पदोन्नतीसाठी या संवर्गात २५% आरक्षणाची निर्णय झाल्याची घोषणा परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी गुरुवारी केली. चालक, वाहक, सहायक, शिपाई, नाईक, हवालदार, उद््वाहन चालक, मजदूर, परिचर, खानसामा, अतिथ्यालय परिचर, सफाईगार, सुरक्षा रक्षक, खलाशी, सहायक माळी, माळी व स्वच्छक या पदावरील कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होईल. राज्यात या पदावर सुमारे १ लाख कर्मचारी कार्यरत आहेत. लिपिक-टंकलेखक यांना सध्या ४,७९० ते १५,६३० रुपये मूळ वेतन आणि नियमानुसार भत्ते असे एकूण ३५ ते ४४ हजार रुपयांपर्यंत वेतन मिळते. दुसरीकडे, शिपाई पदासाठी ११ ते २१ हजार रुपये पगारापर्यंत वेतनश्रेणी आहे. म्हणजेच नव्या आरक्षणामुळे शिपायांच्या पगारात दुपटीपर्यंत वाढ होऊ शकते. 

बातम्या आणखी आहेत...