आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी कामगारांच्या मुलांना दरमहा ७५० रुपये मिळणार; परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची घाेषणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा- ‘एसटी महामंडळातील कामगारांच्या वेतनात नुकतीच भरभरून वाढ केली. ही वाढ कोणत्या युनियनचा मंत्री आहे म्हणून नव्हे, तर सर्व कामगारांचा मंत्री म्हणून केली. आता या कामगारांच्या दहावी-बारावीत शिकणाऱ्या मुलांच्या खात्यात दरमहा ७५० रुपये टाकण्याचा महामंडळाचा प्रयत्न अाहे, जेणेकरून ताे शिक्षण घेताना स्वत:चा खर्च भागवू शकेल,’ अशी घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली.  


बुलडाणा येथे एसटी कामगार सेनेच्या मेळाव्यात ते बाेलत हाेते. रावते म्हणाले, ‘एसटी बसेसची ताेडफाेड, जाळपाेळ झाली याचा पोलिस भलेही तपास करतील, परंतु ज्या एसटीमुळे उदरनिर्वाह चालतो त्या ‘माते’वरच दगड उचलत असतील तर दु:ख वाटते,’ अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. शहीद जवानांच्या वारसांसाठी स्व. ठाकरे सन्मान योजना अाणली. त्यानुसार शहिदांच्या वारसांना एसटीत नोकरी तसेच वीरपत्नींना आजीवन बसचा मोफत प्रवास पास देण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...