आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोकादायक वळणांवर वर्षात 54 हजार अपघात; उपाय म्हणून कारमध्ये बसवणार स्टेबिलिटी कंट्रोल सिस्टिम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- धोकादायक वळणावर वाहनाचे संतुलन बिघडल्याने वर्ष २०१७ मध्ये ५४ हजार रस्ते अपघात घडले. या अपघातांमध्ये १७ हजार लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे रस्ते अपघातांची संख्या कमी व्हावी म्हणून अाता कारमध्ये इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल सिस्टिम लावण्यात येणार आहे. यासंदर्भात रस्ते, परिवहन मंत्रालयाने मसुदा तयार केला आहे. त्यासाठी येत्या फेब्रुवारीत अधिसूचना काढण्यात येईल आणि २०२१ पासून ही सिस्टिम बसवलेली वाहने विक्रीसाठी बाजारात येतील.

 

सन २०२१ पासून बाजारात येणाऱ्या एम-१ ग्रेड (९ किंवा त्यापेक्षा कमी आसनक्षमता असलेल्या) कारमध्ये स्टेबिलिटी कंट्रोल लावणे अनिवार्य असेल. सध्या प्रत्येक देशात वाहनांमध्ये ही सिस्टिम बसवणे ऐच्छिक आहे; परंतु २०२१ मध्ये स्टेबिलिटी कंट्रोल असलेली वाहने विक्री होणारा भारत पहिला देश असेल.

 

दरम्यान, धोकादायक वळणांवर अचानक ब्रेक लावल्याने मागील टायरची ग्रीप कमकुवत होते. अशा स्थितीत टायर घसरून गाडी अनियंत्रित होण्याचा धोका संभवतो. बहुतांशी वेळा अपघाताचे हेच मुख्य कारण ठरत असते. मात्र, स्टेबिलिटी कंट्रोल सिस्टिम लावल्यानंतर वळणावर आपोआप वाहनाची गती कमी होईल आणि वाहन नियंत्रणात राहील. स्टेबिलिटी कंट्रोल सिस्टिम बसवण्यासाठी वाहननिर्मात्या कंपन्यांना वाहनांच्या निर्मितीत बदल करावे लागणार आहेत. यासाठी अधिसूचना जारी केल्यानंतर संबंधित मंत्रालय कंपन्यांना २ वर्षांचा कालावधी देत आहे. याबाबत अधिक माहिती देताना सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्सचे महासचिव सुगांतो सेन म्हणाले की, वाहनात ही सिस्टिम लावल्यानंतर किमतीवर याचा परिणाम दिसून येणार आहे. या यंत्रणेचा सर्वांनाच फायदा हाेईल; परंतु वाहनांच्या किमती वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

 

फोनमधील जायरोस्कोप सेन्सर कंट्रोल सिस्टिममध्ये
या सिस्टिममध्ये जायरोस्कोल सेन्सर बसवण्यात आले आहे. याद्वारे  एखादी वस्तू विशिष्ट बाजूला झुकल्यानंतर याची माहिती मिळत असते. हे सेन्सर मोबाइल फोनमध्ये लावण्यात येते. याचमुळे फोन सरळ किंवा आडवा धरल्यानंतर व्हिडिओ आपोआप स्क्रिनप्रमाणे दिसते. जायरोस्कोप सेन्सरमुळेच फोनला उलटे धरल्यानंतर तो सायलेंट होत असतो. हाच सेन्सर आता स्टेबिलिटी कंट्रोलमध्ये लावण्यात येईल. टायरच्या बाजूने वाहन झुकल्यानंतर सेन्सरद्वारे याची माहिती मिळेल.

बातम्या आणखी आहेत...