आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी सायंकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी निधन झाले. केंद्र सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. बिहार, झारखंड, मध्य प्रदेशात उद्या सुटी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रात उद्या पारसी नववर्षारंभाची सुटी असल्याने अतिरिक्त जाहीर करण्यात आलेली नाही.
अटलजींचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी सकाळी 6 ते 9 या वेळेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी दीड वाजता त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होईल. दुपारी 4 वाजता राजघाटामागील राष्ट्रीय स्मृती स्थळी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. दरम्यान, गुरुवारी दुपारीच अटबिहारी वाजपेयी यांच्या घराबाहेर स्टेज तयार करण्यात आले होते. याच स्टेजवर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
एनडीएचे मुख्यमंत्री आणि इतर नेतेही त्यांचे पूर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून दिल्लीला पोहोचले आहेत. 17 आणि 18 ऑगस्ट रोजी होणारी भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकही रद्द करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.