आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टॅलिन, रजनीकांतची राहुल गांधींना राजीनामा न देण्याची विनंती, लाेकसभा निवडणुकीतील पक्षाने केलेली कामगिरी बघता राजीनामा देण्याची गरज नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - लाेकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने अपेक्षेप्रमाणे कामगिरी न केल्यामुळे पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा देऊ नये, अशी विनंती द्रविड मुन्नेत्र कळघमचे (द्रमुक) अध्यक्ष एम.के. स्टॅलिन आणि प्रसिद्ध अभिनेता रजनीकांत यांनी केली आहे. लाेकसभा निवडणुकीतील पक्षाने केलेली कामगिरी बघता राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याची आवश्यकता नाही, असे मत या दाेन्ही नेत्यांनी व्यक्त केले आहे.

 

राहुल गांधी यांच्याशी आपण या संदर्भात दूरध्वनीवर चर्चा केली आहे. लाेकसभा निवडणुकीत तुमचा पराभव झालेला असला तरी तुम्ही लाेकांची मने जिंकली आहेत. त्यामुळे आपण पक्षाचे अध्यक्षपद साेडण्याच्या प्रस्तावावर विचार करू नये, अशी विनंती केली असल्याचे द्रमुक अध्यक्ष स्टॅलिन यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

 

पाेटनिवडणुकांमध्ये द्रमुक प्रणीत आघाडीने ३८ पैकी ३७ जागा जिंकल्या आहेत. या विजयाबद्दल राहुल गांधी यांनी स्टॅलिन यांचे अभिनंदनही केले आहे. या आघाडीमधील काँग्रेस घटक पक्षाला आठ जागा मिळाल्या आहेत. लाेकसभा निवडणुकीत स्टॅलिन यांच्या पक्षानंतर साेनिया यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.