आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीला प्रपोज करणे पडले महागात: गिफ्ट फेकले मुलीसाठी पण मिळाले वडिलांना, नंतर झाली तुरूंगवारी...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दिल्लीतील एका युवकाला मुलीला प्रपोज करणे महागात पडले. युवकाला शेजारी राहणारी मुलगी आवडत होती आणि त्याला तिच्यसोबत लग्न करायचे होते. त्याने मुलीला प्रपोज करण्यासाठी तिच्या गच्चीवर एक गिफ्ट फेकले. गिफ्टमध्ये ताजमेहलची छोटी प्रतिकृती होती. त्याने ते ताजमहेल गच्चीवर फेकले आणि ते चुकून मुलीच्या वडिलांच्या डोक्याला लागले. त्यानंतर युवकाला थेट तुरूंगात जावे लागले.

 

मुलीच्या गच्चीवर फेकले गिफ्ट
- प्रकरण कालिंदी कुंज परिसरातील आहे. येथे राहणाऱ्या 22 वर्षीय जीतुला शेजारी राहणाऱ्या मुलगी आवडायची. सोमवारी रात्री तो लग्नाचे प्रपोजल घेऊन मुलीच्या घराच्या मागे गेला.
- जीतुने तिला प्रपोज करण्यासाठी ताजमेहलची छीटी प्रतीकृती घेऊन गेला आणि त्याने ते गिफ्ट मुलीच्या गच्चीवर फेकले. 
- योगायोगाने त्यावेळेस मुलीचे वडील गच्चीवर जेवण करत होते आणि ते गिफ्ट त्यांच्या डोक्यात पडले. त्यानंतर त्यांच्या घरात खुप गोंधळ झाला आणि मुलीवर प्रेम संबंध सुरू असल्याचे आरोप लागले.
- त्यानंतर मुलीने सगळे सांगितले की, जीतु रोज तिचा पाठलाग करायचा आणि तिला लग्नाचे प्रपोजल दिले आहे. 
- मुलीने जीतुवर आरोप लावले की, त्याने तिच्यावर जातमेहल घेण्याचा आणि लग्नाचे प्रपोजल स्वीकारण्याचा दबाव टाकला होता. 


कुटुंबाने दाखल केली तक्रार
- त्यानंतर 20 वर्षीय मुलगी आणि तिच्या कुटुंबाने पोलिस ठाण्यात जीतुविरोधात तक्रार दाखल केली.
- त्यानंतर पोलिसांनी जीतुला त्याच्या घरातून अटक केले आणि घरातून दुसरी एक ताजमेहलची प्रतीकृती जप्त केली.
- जीतुने कबुल केले की, तो रोज मुलीचा पाठलाग करायचा आणि तिला रस्त्यात अडवून लग्नासाठी प्रपोज करायचा.
- साउथ ईस्टचे डीसीपी चिन्मय बिस्वास यांनी सांगितले की, आम्ही मुलाविरूद्ध लैंगिक छळ आणि पाठलाग करण्याची तक्रार दाखल केली आहे.

बातम्या आणखी आहेत...