Home | Jeevan Mantra | Dharm | stambheshwar mahadev temple gujrat information

हे शिव मंदिर दिवसातून दोनदा जाते समुद्राच्या पोटात, काही काळाने पुन्हा त्याच जागेवर दिसते

रिलिजन डेस्क | Update - Aug 28, 2018, 12:02 AM IST

भारतामध्ये महादेवाची अनेक मंदिरे आहेत, परंतु गुजरात राज्यातील बडोदापासून 85 किलोमीटर अंतरावर स्थित जंबूसर तहसील क्षेत्रा

 • stambheshwar mahadev temple gujrat information

  श्रावण महिन्यात महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी विशेष उपासना केली जाते. हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवी-देवतांचा उल्लेख असून यामध्ये सर्वात जास्त व्रत, उपासना देवांचे देव महादेव यांची केली जाते. आज आम्ही तुम्हाला गुजरातमधील एका अनोख्या महादेव मंदिराची माहिती सांगत आहोत. भारतामध्ये महादेवाची अनेक मंदिरे आहेत, परंतु गुजरात राज्यातील बडोदापासून 85 किलोमीटर अंतरावर स्थित जंबूसर तहसील क्षेत्रातील कावी-कंबोई गावातील या मंदिराची एक खास विशेषता आहे.


  दिवसातून दोन वेळेस हे मंदिर सागराच्या उदरात जाते...
  स्तंभेश्वर नावाचे हे महादेव मंदिर दिवसातून दोन वेळेस सकाळी आणि संध्याकाळी क्षणभरात डोळ्यांसमोरून अदृश्य होते आणि काही वेळानंतर पुन्हा त्याच जागेवर दिसते. असे समुद्राला आलेल्या (ज्वारभाटा) भरती, आहोटीमुळे होते. या काळामध्ये तुम्ही शिवलिंगाचे दर्शन घेऊ शकत नाहीत. कारण समुद्रात मोठमोठ्या लाटा निर्माण झाल्यानंतर हे शिवलिंग पूर्णपणे जलमय होते आणि मंदिरापर्यंत कोणीही जाऊ शकत नाही. ही प्रक्रिया प्राचीन काळापासून चालू आहे. हे मंदिर अरबी समुद्राच्या तटावर स्थित आहे.


  या तीर्थक्षेत्राचा उल्लेख ‘श्री महाशिवपुराणातील रुद्र संहिता भाग-2, अध्याय 11, पान क्रमांक 358 वर आढळून येतो. या मंदिरांचा शोध 150 वर्षांपूर्वी लागला असून मंदिरात स्थित शिवलिंगाचा आकार 4 फुट उंच आणि दोन फुट व्यास असा आहे. या प्राचीन मंदिरामागे अरबी समुद्रांचे विहंगम दृश्य दिसते.


  पुढे जाणून घ्या, शिव पुत्र कार्तिकेयने या मंदिराची का केली स्थापना...

 • stambheshwar mahadev temple gujrat information

  तारकासुर राक्षसाने कठोर तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न केले होते. महादेवाने प्रसन्न होऊन तारकासुराला वर मागण्यास सांगितले, तेव्हा तारकासुराने असे वरदान मागितले की, 'मला केवळ तुमचा मुलगाच मारू शकेल आणि त्याचे वय फक्त सहा दिवसांचे असेल.' महादेवाने त्याला हे वरदान दिले. वरदान मिळताच तारकासुर देवता, ऋषीमुनी, सामान्य लोक, प्राणी सर्वांना त्रास देऊ लागला. त्याच्या त्रासाला कंटाळून सर्व देव महादेवाकडे गेले. शिव-शक्तीच्या श्वेत पर्वत कुंडातून उत्पन्न झालेल्या शिव पुत्र कार्तिकेयला 6 मस्तिष्क, 4 डोळे आणि बारा हात होते. कार्तिकेयने वयाच्या केवळ सहाव्या दिवशीच तारकासुराचा वध केला.

 • stambheshwar mahadev temple gujrat information

  तारकासुराचा वध केल्यानंतर कार्तिकेयला समजले की, तारकासुर महादेवाचा भक्त होता. हे ऐकून कार्तिकेय दुःखी झाला. त्यानंतर भगवान विष्णूने कार्तिकेयला तारकासुराचा वध केलेल्या ठिकाणी महादेवाचे मंदिर बांधण्यास सांगितले. त्यानंतर कार्तिकेय आणि सर्व देवतांनी महिसागर संगम तीर्थावर विश्वनंदक स्तंभाची स्थापना केली, जे आज स्तंभेश्वर तीर्थ नावाने ओळखले जाते.


  पुढे पाहा, या मंदिराची खास छायाचित्रे...

 • stambheshwar mahadev temple gujrat information
 • stambheshwar mahadev temple gujrat information

Trending