आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई विमानतळावर स्टँपिंग होणार बंद, हे देशातील पहिलेच विमानतळ बनले आहे...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबई विमानतळावर टर्मिनल २ वरून उड्डाण घेणाऱ्या डोमेस्टिक प्रवाशांना आता आपल्या बोर्डिंग पासवर शिक्का मारून घेण्याची गरज राहणार नाही. प्रवासी आता सिक्युरिटी चेक पॉॅइंटवरील ई-गेट रीडरवर बोर्डिंग पासचा बारकोड वा क्यूआर कोड स्कॅन करून लाइव्ह पॅसेंजर डेटासेटच्या माध्यमातून प्रमाणित करू शकतील. बोर्डिंग पासवर शिक्का मारणाऱ्या सीआयएसएफ चेकिंग कर्मचाऱ्याची पासच्या पडताळणीची जबाबदारी संपुष्टात येईल.

 

एमआयएएलनुसार, यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल व सुरक्षा तपासणी प्रक्रियेत सुधारणा होईल. अशा तंत्रज्ञानाचा अवलंब करणारे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे  देशातील पहिलेच विमानतळ बनले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...