आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टॅन ली यांना 17 व्या वर्षीच करावी लागली व्यंगचित्र सहायकाची नाेकरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयाॅर्क - ब्लॅक पँथर , स्पायडरमॅन, द एक्स-मॅन, द मायटी थाॅर, अायरनमॅन-हल्क यासारखी सुपरहीराेची पात्रे निर्माण करणारे ‘मार्व्हल’ काॅमिक्सचे संस्थापक स्टॅन ली यांचे निधन झाले. अमेरिकेच्या लाॅस एंजलिसमध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला. ते ९५ वर्षांचे हाेते.

 
२८ डिसेंबर १९२२ राेजी न्यूयाॅर्कमध्ये जन्मलेले ली यांचे अाई-वडील प्रवासी ज्यू हाेते. गरिबीमुळे ली यांना वयाच्या १७ व्या वर्षापासूनच नाेकरी करावी लागली. त्या वेळी त्यांना काकांच्या मदतीने ‘टाइमली’ मासिकात व्यंगचित्र सहायकाची नाेकरी मिळाली. तेथे ते पेनात शाई भरणे, फायली इकडून तिकडे नेणे अादी कामे करत. त्यानंतर पात्रता अाेळखून त्यांना काॅमिक बुक लिहिण्याचे काम देण्यात अाले. त्यात त्यांनी पहिला सुपरहीराे डिस्ट्राॅयर रेखाटला. त्यामुळे १९ व्या वर्षीच ते एडिटर-इन-चीफ बनले.


तीनपेक्षा जास्त दशकांपर्यंत पटकथालेखन केल्यानंतर ते १९७२ मध्ये ‘मार्व्हल’ काॅमिक्सचे प्रकाशक बनले. स्टॅन ली यांचे यांच्या या क्षेत्रातील काैशल्याची अाेळख यावरून हाेते की, गत १० वर्षांत त्यांचा स्टुडिअाे ‘मार्व्हल युनिव्हर्स’ने २० चित्रपट काढले व या चित्रपटांनी १.३ लाख काेटी रुपयांचा व्यवसाय केला. म्हणजे, त्यांच्या चित्रपटांनी सरासरी ६,५०० काेटी रुपये कमावले. अॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वाॅर, अॅव्हेंजर्स : एज अाॅफ अल्ट्राॅन, अॅव्हेंजर्स अंॅड ब्लॅक पॅंथर या चार चित्रपटांचा अातापर्यंतच्या टाॅप-१० चित्रपटांत समावेश हाेताे. त्यांच्या पात्रांचे जगभर कोट्यवधी चाहते होते. 

 

स्टॅन ली यांचे पूर्ण नाव ‘स्टॅन ली मार्टिन लायबर’ असे हाेते. मात्र, त्यांनी हे नाव कधीच वापरले नाही. काही तरी माेठी कामगिरी केल्यानंतरच स्वत:चे खरे नाव वापरायचे त्यांनी ठरवले हाेते. काॅमिक्स लिहिण्यासाठी केवळ ‘स्टॅन ली’ एवढेच नाव वापरले. नंतर याच नावाने ते अाेळखले जाऊ लागले. त्यांनी निर्माण केलेल्या पात्रांत असामान्य शक्ती हाेती. वाचकांना त्या पात्रांत संपूर्ण ब्रह्मांडावर सत्ता गाजवणारा हीराे दिसून येई.

 

भारतीय सुपरहीराे अॅनिमेटेड चित्रपट ‘चक्र’ला मदत    
२०१३ मध्ये शरद देवरंजन व गाैतम चाेपडा यांनी स्टॅन लींसाेबत मिळून एक भारतीय सुपरहीराे चित्रपट ‘चक्र’ बनवला. कार्टून नेटवर्कच्या भारतीय वाहिनीवर सादर झालेला हा एक अॅनिमेशनपट हाेता. या चित्रपटासाठी ली यांनी ग्राफिक इंडियासाेबत मिळून काम केले हाेते.  

 

पत्नी म्हणाली- काॅमिक्स लिहा 
४० व्या वर्षी ली यांना काॅमिक्ससाठी अापण वृद्ध झाल्याचे जाणवले. मात्र, पत्नी जाेअानने समजावल्यावर १९६१ मध्ये त्यांनी ‘द फॅन्टास्टिक फाेर’ लिहिले. याचे कथेने ‘मार्व्हल’ काॅमिक्स सुरू झाले.

 

चित्रपटांत अभिनयही केला
दुसऱ्या महायुद्धात ते अमेरिकी सैन्याकडून लढण्यास गेले. त्यानंतर लष्कर साेडून पुन्हा काॅमिकमध्ये परतले. ली हे स्वनिर्मित पात्रांवर बनलेल्या चित्रपटांत एक छाेटीशी भूमिकाही साकारत.

बातम्या आणखी आहेत...