आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणी बसस्थानकात उभ्या बसने घेतला पेट; प्रवाशांना तातडीने उतरवल्याने टळला मोठा अनर्थ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - प्रवाशांनी भरलेल्या एस.टी.बसच्या केबिनमध्ये मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास अाग लागल्याने मोठा गोंधळ उडाला. तातडीने प्रवाशांना उतरवण्यात आले. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.


बीडहून किनवटकडे जाणारी महामंडळाची बस (एमएच २० बीएल १९०६) परभणी स्थानकात सकाळी साडेआठच्या सुमारास दाखल झाली. बसमध्ये प्रवासी मोठ्या संख्येने होते. बसस्थानकात आल्यानंतर वसमत व नांदेडकडे जाणारे प्रवासी चढू लागले तर आतील प्रवासी उतरत होते. चालक व वाहकही बसमधून उतरले. तितक्यातच केबिनमध्ये धूर येत असल्याचे निदर्शनास आल्याने प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली. यावेळी एकच गोंधळ उडाल्याने फलाटावरील अन्य प्रवाशी मोठ्या संख्येने दाखल झाले.  नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने अग्निशमन दलास पाचारण केले. 

बातम्या आणखी आहेत...