आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Star Buck Closes 2000 Branches In China, Toyota Stops Work In China, Ikea Closes Half Of Its Stores

स्टारबकने चीनमध्ये 2000 शाखा बंद केल्या, टाेयाेटाने चीनमधील काम राेखले, आयकियाने निम्मे स्टोअर केले बंद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अॅपलने चीनमध्ये स्टाेअरचा वेळ घटवला, प्रवास करण्यास कर्मचाऱ्यांना मनाई
  • आता जवळपास 132 लोकांचा मृत्यू, 6000 पेक्षा जास्त संसर्गजन्य नागरिकांचा झाला मृत्यू

​​​​​​नवी दिल्ली : अमेरिकन काॅफी कंपनी अाणि काॅफी हाऊस चेन स्टारबकने काेराेना विषाणूमुळे चीनमधील अापल्या २००० शाखा(जवळपास निम्म्या) तात्पुरत्या बंद करण्याचा निर्णय घेतला अाहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, अापल्या कर्मचाऱ्यांना विषाणूपासून वाचवण्यासाठी अाणि त्याचा संसर्ग राेखण्यासाठी सरकारच्या मदतीसाठी हा निर्णय घेतला अाहे. स्टारबकच्या चीनमध्ये सुमारे ४३०० अाऊटलेट्स अाहेत.

अमेरिकेनंतर अन्य काेण्या देशातील या सर्वाधिक अाहेत. स्टारबकच्या जागतिक महसुलात चीनचे याेगदान १०% अाहे. स्टारबकसाठी अमेरिकेनंतर चीन दुसरी महत्त्वाची बाजारपेठ अाहे. चीनमध्ये वेगाने संसर्ग हाेणाऱ्या काेराेना विषाणूमुळे अातापर्यंत १३० लाेकांचा मृत्यू झाला असून ६००० पेक्षा जास्तींना संसर्ग झाला अाहे. जागतिक अाराेग्य संघटनेनेही चीनला अापत्कालीन श्रेणीत ठेवले अाहे. जपानची वाहन निर्माती कंपनी टाेयाेटानेही बुधवारी चीनमधील अापले सर्व प्रकल्प ९ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याची घाेषणा केली अाहे. कंपनीनुसार, सरकारचे मार्गदर्शक तत्त्व अाणि अन्य कारणांमुळे अाम्ही अापले सर्व चिनी प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला अाहे. या विषाणू संसर्गामुळे जगातील माेठ्या कंपन्यांना अाव्हानांचा सामना करावा लागत अाहे. अॅपलचे बाॅस टीम कुक यांनी सांगितले की, काेराेना िवषाणूवर खूप जवळून निगराणी केली जात अाहे. अॅपलने चीनमध्ये अापला स्टाेअर टाइम निम्मा केला अाहे. कर्मचाऱ्यांना प्रवास करण्यास नकार दिला अाहे. फेसबुकने सर्वात अाधी गेल्या अावठवड्यात अापल्या स्टाफला चीनला न जाण्याची सूचना केली हाेती. बहुतांश चिनी कंपन्यांनीही कर्मचाऱ्यांना याअाधीच वर्क फ्राॅम हाेमची सुविधा दिली अाहे. बहुतांश संसर्गबाधित भागांतून येणाऱ्या लाेकांना कामावर न येण्याचे निर्देश दिले अाहेत. सूत्रांनुसार, अन्य माेठ्या कंपन्याही सद्य:स्थिती पाहता चीनमधील कामे तात्पुरते थांबवण्याचा विचार करत अाहेत.

भारतासह ३० देशांत काेराेना विषाणूचा सर्वाधिक धाेका

काेराेना विषाणूचा सर्वात जास्त जाेखमीच्या देशांत किंवा शहरांत थायलंड, जपान अाणि हाँगकाँग सर्वात वर अाहेत. अभ्यासानुसार, अमेरिकेला सहाव्या क्रमांकावर ठेवले अाहे. अाॅस्ट्रेलियाला १० व्या, ब्रिटनला १७ व्या अाणि भारतास २३ व्या क्रमांकावर ठेवले अाहे. युनिव्हर्सिटी अाॅफ साऊथम्पटनच्या वर्ल्ड-पाॅप टीमच्या अहवालानुसार, बँकाॅक विषाणूचा सर्वाधिक धाेका असणाऱ्या शहरांपैकी एक अाहे.
 

बातम्या आणखी आहेत...