आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाबच्‍या रणांगणात उतरणार भाजपचे स्‍टार प्रचारक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदीगड- पंजाब कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष कॅप्‍टन अमरिंदर सिंग यांच्‍या बंधूने पक्षत्याग करून सत्तारूढ अकाली दलात प्रवेश केला आहे. त्‍यामुळे मनोबल उंचावलेल्या अकाली दलाचा मित्रपक्ष भाजपने आता स्टार प्रचारक रणधुमाळीत उतरविण्याचा निर्धार केला आहे. नरेंद्र मोदी व नितीशकुमार पंजाबातील निवडणुकीत अकाली दल-भाजप आघाडीसाठी प्रचार करणार आहेत. याशिवाय क्रिकेटपटू व तारे-तारकांची फौजही भाजपच्या दिमतीला असेल.

मोदी व नितीशकुमार या दोघांनीही पंजाबात प्रचारसभा घेण्याची तयारी दाखविल्याचे भाजपचे प्रवक्ते जे. पी. नड्डा यांनी सांगितले. कॅप्टन अमरिंदरसिंग यांचे धाकटे बंधू मलविंदरसिंग यांनी उमेदवारी न मिळाल्याने नाराज होऊन कॉंग्रेसमधून बाहेर पडले आहेत. मलविंदरसिंग यांच्‍या प्रवेशामुळे अकाली दलासह भाजपमध्ये आनंदाचे वातावरण आहे.