आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडच्या प्रसिद्ध खलनायकाच्या मुलापासून ते मोहनीश बहलच्या मुलीपर्यंत, हे 8 न्यूकमर्स 2019 मध्ये करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, 4 जणांच्या चित्रपटांचे शूटिंग पूर्ण : Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- 2019 या नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. या नवीन वर्षात अनेक स्टार किड्स आणि नवोदित कलाकार बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज झाले आहेत. 2018 मध्ये जान्हवी कपूर, ईशान खट्टर, सारा अली खान या स्टार किड्सनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. आता 2019 मध्ये दिवंगत अभिनेते अमरिश पुरी यांचा नातू वर्धन पुरी डेब्यूसाठी सज्ज आहे. बातम्यांनुसार, वर्धनला आतापर्यंत दोन चित्रपट ऑफर झाले आहेत. वर्धनशिवाय गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री नूतन यांची नात आणि मोहनीश बहलची मुलगी प्रनूतन 2019 मध्ये अभिनयात करिअर सुरु करणार आहे. वर्धन आणि प्रनूतनशिवाय आणखी 6 जण या नवीन वर्षात अभिनय क्षेत्रात श्रीगणेशा करणार आहेत. या पॅकेजमधून एक नजर टाकुयात राइजिंग स्टार्सवर... 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

❄️ ☀️ ☔️ 🍂 🍁 @spykarofficial

A post shared by Vardhan Puri (@vardhanpuri02) on Nov 22, 2018 at 2:01pm PST

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Thank you @makeupbyreshmerchant and @ashwini_hairstylist 🙂🙌❤️

A post shared by Pranutan Bahl (@pranutan) on Dec 20, 2018 at 2:03am PST

 

1. श्रीदेवींची धाकटी मुलगी खुशी करतेय डेब्यू... 
- दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशी कपूर बॉलिवूडमध्ये डेब्यूसाठी सज्ज आहे. जान्हवीची धाकटी बहीण असलेली खुशी 2019 मध्ये जान्हवीला कॉम्पिटिशन देऊ शकते. करण जोहर लवकरच खुशी आणि जावेद जाफरींचा मुलगा मिजानला लाँच करणार आहे.  

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

No caption needed!!!!!! @khushi05k ❤❤ #khushibae #khushilo #khushikapoor

A post shared by khushi kapoor (@khushi.kapoorr) on Nov 6, 2018 at 12:37am PST

 

2. धर्मेंद्र यांचा नातू करतोय डेब्यू...

- गतकाळातील प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांचा नातू आणि  सनी देओलचा मुलगा करण देओलसुद्धा बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतोय.  'पल पल दिल के पास' हे करणच्या पहिल्यावहिल्या बॉलिवूड चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून सनी देओल दिग्दर्शित हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे.  

 

 

3. डॅनीचा मुलगा करणार बॉलिवूडमध्ये एंट्री...
- बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध खलनायक  म्हणून स्वतःची वेगळी छाप उमटवणारे डॅनी डेन्जोंगपा यांचा मुलगा रिंजिंगसुद्धा यावर्षी आपल्या अभिनय करिअरला सुरुवात करतोय. बातम्यांनुसार, डॅनी यांचा मुलगा रिंजिंग एका इमोशनल अॅक्शन थ्रिलरपटातून करिअरची सुरुवात करणार आहे. त्याच्या डेब्यू चित्रपटाचे नाव 'स्कॉड' असून त्यात जबरदस्त अॅक्शन बघायला मिळणार आहे. 

 

 

 

4. टीव्ही अभिनेत्री तारासोबत टायगर श्रॉफ करणार रोमान्स...
- गायिका आणि टीव्ही अभिनेत्री तारा सुतारिया लवकरच टायगर श्रॉफसोबत 'स्टुडंट ऑफ द इयर-2' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. टायगर आणि अनन्या पांडे (चंकी पांडेची मुलगी) यांना सगळे ओळखतात, मात्र तारा हिचा बॉलिवूडशी काहीही संबंध नव्हता. तारा अभिनेते विनोद मेहरांचा मुलगा रोहनची गर्लफ्रेंड आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Pretty? Nah, The Prettiest. ♥️😍

A post shared by TARA SUTARIA WORLD (@tarasutaria.world) on Oct 9, 2018 at 9:51am PDT

 

5. करण जोहरच्या चित्रपटातून डेब्यू करतेय चंकी पांडेची मुलगी...

- चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेसुद्धा यावर्षी बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. करण जोहरच्या आगामी 'स्टुडंट ऑफ द इयर 2'मधून ती फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवतेय. पुनीत मल्होत्रा दिग्दर्शित या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे.  

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

take me out of the oven because I’m done 🤷🏻‍♀️

A post shared by Ananya 👩🏻‍🎓💫 (@ananyapanday) on Dec 19, 2018 at 6:48am PST

 

6. कंगना रनोटच्या चित्रपटात झळकणार अंकिता लोखंडे
- 'पवित्र रिश्ता' या टीव्ही मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करणार असून हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी रिलीज होणार आहे.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#manikarnika #jhalkaribai 🌺

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on Dec 26, 2018 at 3:20am PST

 

 

बातम्या आणखी आहेत...