आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वक्तव्य : अक्षय-आयुष्मानसारखे स्टार्स समलैंगिक आणि गे रोल्स साकारून बदलत आहेत ट्रेंड - ओनिर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : 'फिल्म शुभ मंगल सावधान' चा सीक्वल 'शुभ मंगल ज्यादा सावधान' मध्ये गे रोमान्स दाखवला जाईल. या फिल्ममध्ये आयुष्मान खुराना समलैंगिक व्यक्तीच्या रोलमध्ये दिसणार आहे. तर अक्षय कुमारदेखील आपली पुढची फिल्म लक्ष्मी बॉम्बमध्ये टांसजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे. दोन्ही कलाकार पहिल्यांदा अशाप्रकारचा रोल करत आहेत. यामुळे दिग्दर्शक-निर्माते ओनिर खूप खुश आहेत, त्यांच्यानुसार ए लिस्टर अभिनेत्यांनी असे रोल केले तर लोकांचा समलैंगिक पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. 

 

हॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्यांनी साकारली आहे समलैंगिक भूमिका... 
ओनिर म्हणाले, ‘मी आयुष्मान आणि अक्षयचा आभारी आहे. मोठमोठे अभिनेते गे भूमिका करण्यात कचरतात. निर्माते अशा सब्जेक्टच्या चित्रपटांवर पैसे इनवेस्ट करत नाही. आयुष्मान, आनंद एल राय आणि अक्षय कुमारमुळे हा ट्रेंड चेंज होईल. हॉलिवूडमध्ये टॉम हैंक्स, लियोनार्डो डिकैप्रियो आणि हीथ लेजर यांसारखे मोठे अभिनेते या सब्जेक्टवर काम करतात. माझा स्वतःचा या टॉपिकमध्ये खूप इंटरेस्ट आहे.  

 

वेगवेगळे रोल केल्याने कमी होत नाही फॅन फॉलोइंग... 
मोठे स्‍टार्स आपले फॅन फॉलोइंग कमी होण्याच्या भीतीने असे रोल करत नाहीत. ते आपल्या नेहमीच्याच यूएसपीवर टिकून राहतात. आता मात्र असे नाहीये. सतत वेगवेगळे रोल केल्यावरही अभिनेत्यांना फॅन्सचे तेवढेच प्रेम मिळते. हेच कारण आहे, ज्यामुळे अक्षय आणि आयुष्मानने ट्रांसजेंडरचा रोल स्वीकारला आहे.  

 

आधी कुणी समलैंगिक संबंधांवर बोलतदेखील नव्हते : सुरेश मेनन... 
फिल्म पार्टनरमध्ये स्टीरियोटाइप गे कॅरेक्टर प्ले करणारे सुरेश मेनन म्हणतात, 'आता तर मी ताशा प्रकारच्या रोल्सला नकार दिला आहे. सुदैवाने आपण अशा काळात राहतो, जेथे आपण या गोष्टींवर मोकळेपणाने बोलू शकतो. ८० आणि ९० च्या दशकात तर अशा टॉपिकवर बोलणेदेखील होत नव्हते. आता कमीत कमी सामान्य लोकांमध्ये एक्सेप्टेंस येऊ लागला आहे. आधीचे स्टार्स अशा कॅरेक्टर्सपासून दूर पाळायचे. पण मनोज बाजपेयीपासून आयुष्मान खुरानापर्यंत अनेकजण असे रोल्स करत आहेत, ज्यामुळे लोकांचे विचार बदलत आहेत.'

बातम्या आणखी आहेत...