आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेत्री नंदना सेन हिने 19 ऑगस्ट रोजी वयाची 50 वर्षे पूर्ण केली आहेत. तिने सिनेमा दिग्दर्शनाचे शिक्षण यूएसी फिल्म स्कूल मधून केले आणि अभिनयाचे शिक्षण स्ट्रॉस्बर्ग थिएटर इंस्टीट्यूट, न्यूयॉर्कमधून पूर्ण केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने अभिनया क्षेत्रात पाऊल ठेवले. बॉलिवूड, हॉलिवूडसोबत इटालियन सिनेमांतही तिने काम केले. बॉलिवूडमध्ये काम करूनदेखील तिला यश मिळाले नाही. मात्र तिच्याच वयाच्या अनेक अभिनेत्री या क्षेत्रात यश मिळवण्यात यशस्वी ठरल्या. बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलेब्स आहेत, ज्यांचे वय सारखेच मात्र त्यामधील कुणी हिट तर कुणी फ्लॉप आहे. अशाच काही जोड्यांबाबत आपण आज जाणून घेणार आहोत.
नंदना सेन आणि माधुरी दीक्षित
नंदना आणि माधुरी दोघींचा जन्म 1967मध्ये झाला. 'अबोध' सिनेमांतून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी माधूरी दीक्षित बी-टाऊनच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. उत्कृष्ट अभिनय आणि शानदार डान्सिंग मूव्हच्या बळावर तिने प्रेक्षकांची मने जिंकली. दुसरीकडे नंदना सेनच्या करिअरचा आलेख काही खास राहिला नाही. तिने पडद्यावर बोल्ड भूमिकासुध्दा साकारल्या. परंतु तरीदेखील तिला यश मिळाले नाही.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, एकाच वयाचे असूनही बॉलिवूडच्या स्टार्सचे करिअर कसे राहिले...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.