आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Stars Performed In Cine Awards In Absence Of Audience, Veteran Artists Attend The Ceremony

प्रेक्षकांच्या गैरहजेरीत सिने अवॉर्ड्समध्ये थिरकले सिनेस्टार्स, सहभागी झाले दिग्गज कलाकार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : बॉलिवूडचा एक मोठा पुरस्कार सोहळा मानल्या जाणाऱ्या झी सिने अवॉर्ड्सचे आयोजन काल रात्री करण्यात आले होते. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन या वेळी या सोहळ्यामध्ये प्रेक्षकांना प्रवेश नाकारण्यात आला. एकही प्रेक्षक नसताना या सोहळ्यात बॉलीवूड सुपरस्टार्सनी हजेरी लावत दमदार सादरीकरण केले.

संपूर्ण कार्यक्रम टेलिव्हिजन इव्हेंट म्हणून शूट करण्यात आला. यामध्ये रणवीर सिंहने व्यूअर्स चॉइस बेस्ट अॅक्टरचा आणि आलिया भट्टने व्हूअर्स चॉइस बेस्ट अॅक्ट्रेसचा पुरस्कार जिंकला. याशिवाय तापसी पन्नुला ‘बदला’मधील अभिनयासाठी बेस्ट अॅक्टर फिमेलची ट्रॉफी देण्यात आली. ‘स्त्री’मध्ये आपल्या मैत्रीद्वारे विनोदाचा नवीन डोस तयार करणाऱ्या अपारशक्ती खुराणा आणि राजकुमार राव यांनी या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. हृतिक रोशनने मंचावर आपले सादरीकरण देण्यास सुरुवात केली तेव्हा यामध्ये सहकलाकारांच्या मदतीने कार्निव्हलसारखे वातावरण तयार झाले होते. हृतिकच्या डान्ससोबतच या आयोजनाचा ग्रँड फिनाले अॅक्ट झाला.

सहभागी झाले दिग्गज स्टार्स

सोहळ्यात दिग्गज स्टार्सनी हजेरी लावली. हृतिक, राजकुमार राव आणि रणवीर सिंहसोबतच सारा अली खान, अनन्या पांडे, कार्तिक आर्यन, गोविंदा, तारा सुतारिया, नोरा फतेही, सिद्धांत चतुर्वेदी आदीही उपस्थित होते. या कलावंतांचा फॅशनेबल अंदाज पाहण्यासारखा होता.

तरुणांसारखा थिरकला हृतिक

हृतिक आपल्या हिट सॉग्ज ‘घुंघरू’, ‘सेनोरिटा’, ‘धूम मचाले’, ‘जय-जय शिव शंकर’, ‘इक पल का जीना’, ‘तू-तू तू मेरी मैं तेरा,’ ‘कहो ना प्यार है’ आदी गाण्यांवर थिरकला. त्याने वयाच्या ४६ व्या वर्षी तरुणांना लाजवेल असे सादरीकरण केले.

साराचा खास ड्रेस

खरंतर हा ड्रेस नव्हता तर तिच्या नृत्याच्यावेळी ज्युनिअर डान्सर्संनी फरचे पंख तिच्या आजूबाजूला धरून गाऊन सारखे तयार केले होते. साराने सादरीकरणादरम्यान घातलेल्या आकर्षक गाऊनची चर्चा होती. नऊ फूट लांब असलेल्या गाऊनकडे लोक आश्चर्याने पाहत होते

मनीष मल्होत्राला बेस्ट कॉस्टयूम डिझायनरचा पुरस्कार मिळाला. या कार्यक्रमामध्ये त्यानेच डिझाइन केलेले ड्रेस घातले होते.

टिपिकल रणवीर

रणवीरने नेहमीप्रमाणे येथे उत्साह दाखवला. त्याने फ्लाइंग डिस्को बॉलवरून येथे एंट्री केली.

यांना मिळाले पुरस्कार

  • उत्कृष्ट चित्रपट : आर्टिकल 15
  • उत्कृष्ट जोडी : सिद्धांत चतुर्वेदी व रणवीर सिंह
  • उत्कृष्ट पदार्पण : सिद्धांत चतुर्वेदी
  • व्यूअर चॉइस, बेस्ट अॅक्टर : रणवीर सिंह, गली बॉय
  • व्यूअर चॉइस, बेस्ट अॅक्ट्रेस : आलिया, गली बॉय
  • बेस्ट अॅक्टर फीमेल : तापसी पन्नू, बदला

सुपरस्टार्सना ट्रिब्यूट

येथे काही सुपरस्टार्सना ट्रिब्यूट देण्यात आली. त्यात शम्मी कपूर यांच्या ‘ओ हसीना जुल्फों वाली’, ‘जितेंद्र यांच्या नैनों में सपना’, मिथुन यांच्या ‘आय अॅम ए डिस्को डान्सर’ या गाण्यांवर नृत्य केले.

 

बातम्या आणखी आहेत...