आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 दिवसात शिकू शकता वेबसाइट बनवणे, वर्षभरात करा 9 लाखांचा बिझनेस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेसमनपासून ते सामान्य माणसापर्यंत प्रत्येकाला आपली वेबसाइट बनवण्याची इच्छा आहे. याच कारणामुळे वेब डिझायनिंगची खूप जास्त डिमांड आहे. तुम्हीही वेब डिझाईन सर्व्हिस प्रोव्हाइड करून चांगली कमाई करू शकता. यासाठी तुमच्याकडे पैसे नसतील तर काळजी करू नका. कदाचित तुम्हाला हे माहिती नसेल की, केंद्र सरकारच्या पंतप्रधान एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम अंतर्गत डिझाइनरला 90 टक्क्यापर्यंत कर्ज दिले जाते. म्हणजेच तुम्हाला 10 टक्के पैसे जमा करावे लागतील. तुम्हाला वेबसाइट डिझाइन करणे जमत नसेल तरीही काळजी करू नका. कारण केंद्र सरकार आता वेब डिझायनिंगचे ट्रेनिंगही देत आहे. एवढेच नाही तर सरकार तुम्हाला कर्जासोबतच सबशिडीही देत आहे. तुम्ही शहरात राहत असाल तर 15 टक्के आणि गावात राहत असाल तर 25 टक्के सबसिडी मिळू शकते. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत, वेबसाइट डिझाइन करण्याचे काम सुरु करत असल्यास त्यासाठी काय करावे लागेल आणि कुठून ट्रेनिंग, लोन, सबसिडी मिळेल.


किती लागेल खर्च
मिनिस्ट्री ऑफ मायक्रो, स्मॉल अँड मिडीयम एंटरप्रायजेस (एमएसएमआय)च्या अधीन काम करत असलेली संस्था खादी आणि व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशनने अशा प्रोजेक्ट्सचे प्रोफाइल आपल्या वेबसाइटवर अपलोड केले आहेत ज्यांना पंतप्रधान एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम अंतर्गत लोन मिळू शकते. या प्रोजेक्ट प्रोफाइलमध्ये वेबसाइट डिझायनिंग सार्व्हिसचाही समावेश आहे. केव्हायसी द्वारे मार्केट रिसर्चच्या आधारे हे प्रोजेक्ट प्रोफाइल तयार करण्यात आले आहेत. यानुसार जर तुम्हाला वेब डिझायनिंग सर्व्हिस प्रोव्हायडर स्वरूपात बिझनेस सुरु करायचा असेल तर कमीतकमी 5 लाख 50 हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये तुम्हाला 90 टक्के कर्ज मिळेल आणि तुमची गुंतवणूक केवळ 55 हजार राहील.


कशी होणार सुरुवात 
सर्वात पहिले तुम्हाला कमीत कमी दोन कॉम्प्युटर, एक मोडेम किंवा वायफाय, लेझर प्रिंटर, स्कॅनर, वेब कॅमेरा, डिजिटल कॅमेरा, केबल, सॉफ्टवेअर, विंडोज, आवश्यक प्रोग्राम, डोमेन रजिस्ट्रेशन, वेब कनेक्शन, ग्राफिक्स, एनिमेटर यासारख्या आवश्यक गोष्टी लागतील.

बातम्या आणखी आहेत...