आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Start Business In This Month And Make Lakhs Of Money

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या महिन्यात सुरू करा हा बिझनेस; एप्रिलपासून सुरू होईल नियमित इनकम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- नववर्षात तुम्ही नविन बिझनेस सुरू करायचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला एका खास बिझनेसविषयी सांगणार आहोत. तो तुम्ही याच महिन्यात सुरू केला तर एप्रिलपर्यंत तुम्हाला नियमित इनकम सुरू होईल. एप्रिलपासून नविन एजुकेशन सेशन सुरू होणार आहे. त्यामुळे शाळेसंबंधित बिझनेस सुरू करण्यासाठी ही एक चांगली संधी आहे. तुम्ही स्कुल बॅगा तयार करण्याची फॅक्टरी उघडू शकता. या बिझनेसमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने मार्केटिंग केल्यास तुम्हाला लाखोंची कमाई होवू शकते. सुरवातीला तुम्हाला बिझनेस सुरू करण्यासाठी 10 ते 12 लाखांची गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला महिन्याला आरामात लाखोंची कमाई होईल. 

 

किती पैशांची गुंतवणूक करुन सुरू करता येऊ शकतो हा बिझनेस
केंद्र सरकारच्या नॅशनल स्मॉल इंडस्‍ट्रीज कॉरर्पोरेशन (एनएसआयसी) अंतर्गत तयार केलेल्या प्रोजेक्ट रिपोर्टनुसार, तुम्ही वर्षाला 15 हजार बॅग तयार करण्याचे ध्येय ठेवले असेल तर त्यासाठी तुम्हाला मशिनरी, तीन महिन्यांसाठी वर्किंग कॅपिटल, रॉ मटेरियल यासाठी कमीत कमी 11 ते 12 लाखांची गुंतवणूक करावी लागेल.

 

बॅगा तयार करण्यासाठी लागणारे रॉ-मटेरियल
तुम्हाला बॅग तयार करण्यासाठी सिंगल निडल फ्लॅट बेड शिवन मशिन, स्क्रीन प्रिंटींग इक्‍वीपमेंट, टुल्स, डिझाइन असलेले कापड, नायलॉन स्ट्रेप, डी-रिंग, झिप, रिवेट्स, कॉटन टेप, बक्कल, लॉक्‍स, धागे-दोऱ्यांसह काही महत्वाच्या गोष्टींची आवश्यकता लागेल.
 
किती असेल कमाई
तुम्ही वेगवेगळ्या बॅगांवर त्यांच्या दर्जानुसार किंमती ठेवली तरी तुम्हाला चांगली कमाई होईल. उदाहरणार्थ साधारण बॅगेची किंमत 100 रुपये ठेवली तर 15 हजार बॅगांची किंमत 15 लाख होते. त्यातून तुमची गुंतवणूक वजा करता तुम्हाला 3 लाखांचा नफा होतो. त्याशिवाय पुढील वर्षी तुम्ही तेवढ्याच संख्येने बॅगा तयार करुन विकल्या तर तुम्हाला लाखो रुपयांचा नफा होवू शकतो.